खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये आजी-आजोबांचे पटवून दिले महत्व

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे आजी आजोबा दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना जीवनात आजी आजोबांचे महत्त्व पटवून देण्यात आले.

शाळेतर्फे दरवर्षी आजी आजोबांबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी तसेच आजी आजोबांबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी आजी आजोबा दिवस साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमात प्री प्रायमरी, पहिली व दुसरी चे विद्यार्थी व त्यांच्या आजी-आजोबांनी सहभाग घेतला. कार्यक्रमात आजी-आजोबांचे चरण पूजन करून त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी आजी -आजोबांचे महत्त्व त्यांचे प्रेम याबद्दल माहिती दिली. आजी आजोबांच्या मनोरंजनासाठी विविध खेळ व कार्यक्रम सादर करण्यात आले. खेळांमध्ये आजी-आजोबांनी देखील सहभाग घेतला. शाळेचे प्राचार्य  विनोद अमृतकर यांनी विद्यार्थ्याना व आजी-आजोबांना त्यांच्यामधील नात्याचे महत्त्व पटवून सांगितले. कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या अध्यक्षा सितिका अग्रवाल व परीक्षक म्हणून जास्मिन भरूचा व नम्रता हिंदुजा यांची उपस्थिती लाभली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button