अमळनेर (प्रतिनिधी) येथील शिरूडनाका परिसरातील एकाने सुभाष चौकात गादीच्या बेडशीटने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमळनेर येथील शिरूडनाका परिसरातील प्रवीण गणपत चौधरी (वय ५८) यांनी २७ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास सुभाष चौकात गादीच्या बेडशीटने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुरुषोत्तम चौधरी यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल घनश्याम पवार करीत आहेत.