अमळनेर (प्रतिनिधी) चोरट्यांनी तालुक्यातील जानवे, लोंढवे येथील घरासमोरून व खळ्यात बांधलेली गुरे चोरीस नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, चेतन शिवदास पाटील यांची ९ हजार रुपये किंमतीच्या एक गावरान जातीची पांढ-या रंगाची गाय (वय ९ वर्षे), १२ हजार रुपये किंमतीच्या दोन जर्शी जातीचे पांढ-या रंगाच्या वासऱ्या (वय ३ वर्षे,) ८ हजार रुपये किंमतीची एक जर्शी जातीची लाल रंगाची गाय (वय ६ वर्षे) असे २९ हजार रुपयांची गुरे चोरीस गेले आहेत. गावातील जगन नवल पाटील यांचे तसेच महारू तेजपान पाटील (रा. जानवे ता.) अमळनेर यांच्या मालकीचे वरील गुरे हे दि. ३१ रोजी रात्री ९ ते दि.१ रोजी सकाळी ५ वाजेचे दरम्यान लोंढवे तसेच जानवे गावाबाहेरील गुरे बांधण्याच्या खळ्यातुन व जगन नवल पाटील यांचे खळ्यातुन आणि महारू तेजपान पाटील (रा. जानवे)यांच्या घरासमोरून चोरट्याने चोरून नेल्यावरून अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस हवालदार कैलास शिंदे हे करत आहेत.