खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

जानवे, लोंढवे येथून खळ्यात बांधलेल्या गुरांची झाली चोरी

अमळनेर (प्रतिनिधी) चोरट्यांनी  तालुक्यातील जानवे, लोंढवे येथील घरासमोरून व खळ्यात बांधलेली गुरे चोरीस नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, चेतन शिवदास पाटील यांची ९ हजार रुपये किंमतीच्या एक गावरान जातीची पांढ-या रंगाची गाय (वय ९ वर्षे), १२ हजार रुपये किंमतीच्या दोन जर्शी जातीचे पांढ-या रंगाच्या वासऱ्या (वय ३ वर्षे,) ८ हजार  रुपये किंमतीची एक जर्शी जातीची लाल रंगाची गाय (वय ६ वर्षे) असे २९ हजार रुपयांची गुरे चोरीस गेले आहेत. गावातील जगन नवल पाटील यांचे तसेच महारू तेजपान पाटील (रा. जानवे ता.) अमळनेर यांच्या मालकीचे वरील गुरे हे दि. ३१ रोजी रात्री ९ ते दि.१ रोजी सकाळी ५ वाजेचे दरम्यान लोंढवे तसेच जानवे गावाबाहेरील  गुरे बांधण्याच्या खळ्यातुन व जगन नवल पाटील यांचे खळ्यातुन आणि महारू तेजपान पाटील (रा. जानवे)यांच्या घरासमोरून चोरट्याने चोरून नेल्यावरून अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस हवालदार कैलास शिंदे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button