अमळनेरातील नामांकित बिल्डर सरजू शेठ गोकलानी लवकरच “मल्टिप्लेक्स” निर्माण करणार
अमळनेर-गेल्या ७५ वर्षांपासून अमळनेर शहर,तालुका व परिसरातील कला रसिकांचे उत्कृष्ठ सिनेमे दाखवून मनोरंजन करणारे अमळनेर येथील सुप्रसिद्ध तंबोली थिएटर उद्या दि १ फेब्रुवारी पासून इतिहास जमा होत असून आज ३१ रोजी या चित्रपट गृहात ठाकरे चित्रपटाचा अखेरचा शो दाखविला जाणार आहे,अमळनेरकरांच्या दृष्टीने हि बॅड न्यूज असली तरी लवकरच या जागेवर अत्याधुनिक असे मल्टिप्लेक्स निर्माण करण्याचे शुभसंकेत थिएटर चे नवे मालक सरजू गोकलानी यांनी दिले आहेत.
अमळनेर शहरात १९४३ साली या चित्रपट गृहाची निर्मिती तंबोली सेठ यांनी केली होती,त्यांनंतर शहरात लक्ष्मी टॉकीज व अजंता टॉकीज या दोन चित्रपट गृहांची निर्मिती झाली,त्याकाळी तिघांमध्ये स्पर्धा असली तरी उत्कृष्ठ व्यवस्थापन,उत्कृष्ठ बैठक व्यवस्था,स्वच्छता,दर्जेदार चित्रपट,उत्कृष्ठ साऊंड आदी बाबींमुळे तंबोली थिएटरच तिघांमध्ये नंबर एक वर राहिले,काळानुसार प्रदर्शित होणारे सर्वच नामांकित चित्रपट याठिकाणी झळकलेत यामुळे हे थिएटर अनेक शौकिनांसाठी जीव कि प्राणच होते,कालांतराने टीव्ही व केबलच्या वाढत्या प्रसारामुळे काही प्रमाणात चित्रपट गृहांचे आकर्षण कमी झाल्याने लक्ष्मी व अजंता हि चित्रपट गृहे बंद पडून संबधित मालकांकडून विक्री झाली,यात अजंता च्या जागेत भंगार चे गोडाऊन आले तर लक्ष्मी टॉकीजचे खुल्या भूखंडात रूपांतर झाले,आजही तो भूखंड तसाच पडून आहे,मात्र उत्तम व्यवस्थापनामुळे तंबोली थिएटर वर टीव्हीचा कोणताही परिणाम न होता ते सुरळीत सुरु राहिले.
दरम्यानच्या काळात या चित्रपट गृहाचे आकर्षक पद्धतीने नूतनीकरण होऊन डिजिटल परंदा,आधुनिक बैठक व्यवस्था निर्माण झाल्याने थिएटर चे आकर्षण अधिकच वाढले,व नवनवीन सुपरहिट चित्रपट याठिकाणी झळकले.केवळ मनोरंजनचं नव्हे तर अनेकांसाठी रोजगाराचे देखील हे साधन होते,अनेक कर्मचाऱ्यांनी आयुष्यभर याठिकाणी नोकरी करून आपला उदरनिर्वाह चालविला,तर बाहेर सायकल स्टॅंड चालकासह चणे फुटाणे विक्रेत्यांनी देखील आपला चरितार्थ चालविला.सुमारे 78 वर्ष या चित्रपट गृहास झाल्याने याची सिल्वर व गोल्डन जुबली देखील उत्साहात साजरी झाली,एवढेच नव्हे तर चित्रपट गृहाच्या निर्मितीचा विचार करता अनेकांच्या किमान तीन पिढ्यानी या चित्रपट गृहात सिनेमा पाहण्याचा आनंद घेतला असल्याने एकप्रकारे भावनिक नातेच या चित्रपट गृहाशी निर्माण झाले होते,काही वर्षांपासून ,इंटरनेट व यू ट्यूब मुळे घरबसल्या मोबाईलवरच सिनेमे पाहता येत असले तरी तंबोली चे महत्व मात्र फारसे कमी झालेच नाही,चांगला चित्रपट झळकल्यास तिन्ही शो हाऊसफुल्ल होत होते,तरीही मेंटेनन्स चा विचार करता काहीना काही परिणाम या चित्रपट गृहावर नक्कीच झाला होता.
अशा परिस्थितीत गेल्या वर्षीच या चित्रपट गृहाच्या मालकाने हे चित्रपट गृह खुल्या जागेसह अमळनेर येथील प्रसिद्ध बिल्डर्स सरजू गोकलानी यांना विक्री केले.त्यानंतर देखील अनेक महिने हे थिएटर अनेक महिने चालू राहून दर्जेदार चित्रपट याठिकाणी झळकले.मात्र लवकरच हे थिएटर बंद होण्याची चर्चा काही दिवसापासून शहरात सुरु असताना नविन मालकांनी खरोखरच दि 1 फेब्रुवारीं पासून हे थिएटर कायमचे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे काही दिवस तरी अमळनेरकर थिएटर पासून वंचित राहणार आहेत. हे थिएटर जमीनदोस्त करून याठिकाणी मल्टिप्लेक्स सह नविन विविध वास्तू उभ्या राहणार आहेत.
अमळनेरकराना मिळणार मल्टिप्लेक्सची भेट
व्यावसायिक दृष्टीकोनातून जुने तंबोली थिएटर बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी याठिकाणी लवकरच अत्याधुनिक मल्टिप्लेक्स उभे राहणार आहे,यामाध्यमातुन थोड्या ब्रेक नंतर पुन्हा दर्जेदार सिनेमांची मालिका अमळनेर शहरात निश्चितपणे सुरु होईल असा विश्वास जागेचे मालक सरजू गोकलानी यांनी व्यक्त केला आहे.