अमळनेर-तालुक्यातील अंतुर्ली रंजाणे येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सुभाष पोपट पाटील सर्वानुमते झालेल्या ग्रामसभेत निवड करण्यात आली.
दि २६ जानेवारी रोजी अंतुर्ली रंजाणे ग्रा प च्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंचा सौ शितल सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत हि निवड करण्यात आली.यावेळी उपसरपंच शिवाजी रामराव पाटील,ग्रा प सदस्य तथा बाजार समितीचे संचालक सचिन बाळू पाटील,खादी ग्रामोद्योग चे अध्यक्ष नारायण पाटील,वि का सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव पाटील,व्हा चेअरमन सौ रेखाबाई गोविंदा पाटील,तसेच दोन्ही गावचे पोलीस पाटील,रेशन दुकानदार,ग्रामस्थ, आदी उपस्थित होते.सदर निवडीबद्दल सर्वांनी सुभाष पाटील यांचे अभिनंदन केले.