खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

तीन बैलांची निर्दयीपणे छोट्या वाहनात कोंबून वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) धुळे येथील बाजारातून खरेदी केलेल्या तीन बैलांची निर्दयीपणे छोट्या वाहनात कोंबून धरणगाव येथे घेऊन जाणाऱ्या बैल मालक आणि गाडी चालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  याबबात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, १३ रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास काही लोकांनी गुरांनी भरलेली गाडी अडवलेली होती. जितेंद्र  निकुंभे व अमोल पाटील या गस्त घालणाऱ्या पोलिसांना गर्दी दिसल्याने त्यांनी चौकशी केली असता इकरार खान मुस्ताक खान वय ३५ रा कसाई वाडा धरणगाव हा चालक बापू परभत धनगर याने धुळ्यातून विकत घेतलेले तीन बैल विना परवाना दाटीवाटीने कोंबून अमळनेर मार्गे धरणगाव घेऊन जात असल्याचे समजले. बैलांना दाटीवाटीने कोंबून चारा पाणीची व्यवस्था न केल्याने पोलिसांनी प्राणी संरक्षण कायदा ,मोटरवाहन कायदा आणि भारतीय न्याय संहिता नुसार वाहन चालक व बैल मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडीसह तिन्ही बैल असा ३ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button