खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

हिंगोने गावात आधार संस्था आणि विप्रोतर्फे बाल मेळावा उत्साहात

उन्हाळी सुटीत मुलांचा आनंद द्विगुणित होण्यासाठी आयोजन

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील हिंगणे खु. ह्या आदिवासी बहुल गावात आधार संस्था व विप्रो यांच्या मार्फत बाल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास उत्स्फूर्तस प्रतिसाद मिळाला.
उन्हाळ्याची सुट्टी असल्याने बाल – गोपाल खेळण्यात मग्न आहेत. त्यांचा आनंदी. द्विगुणीत व्हावा, मुलांसोबत वेळ घालावा म्हणून मेळावा घेण्यात येत आहे. सुरुवातील मुलांसोबत विविध विषयांवर गप्पा रंगल्या. ज्यात आहार- स्वच्छता अशा विषयांवर असिस्टंट विप्रो एच. आर. मॅनेजर बडगुजर व डॉ.भारती पाटील व रेणू प्रसाद यांनी मुलांसोबत संवाद साधला त्यानंतर मुलांसोबत विविध खेळ खेळण्यात आले ज्यात विप्रोचे मॅनेजर सुनील वाघ, किरण पाटील, दर्शन चौधरी, दीपक पाटील, आणि आधार संस्थेचे संस्थेचे कर्मचारी दीप्ती गायकवाड, मोहिनी पाटील , तोसिफ शेख यांनी पुढाकार घेतला. पोष्टिक खाऊ वाटप करून मिळाव्याची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिंगोली खुर्दे प्राथमिक शाळेतील शिक्षक नितीन वारुळे, विद्या सैंदाणे, अंगणवाडी सेविका मंगलबाई बडगुजर, आशा वर्कर छाया मधुकर पाटील यांनी सहकार्य केले.

जाहिरात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button