खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

विप्रो जवळ रेल्वे पुलाखाली गटारीत सायकलस्वराचा पडल्याने झाला मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी) एका सायकलस्वराचा गटारीत पडून मृत्यू झाल्याची घटना दि.23 रोजी  विप्रो कंपनीजवळील रेल्वे पुलाखाली घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अशोक गिरीधर चौधरी (वय 60 मूळ राहणार नाशिक, हल्ली मुक्काम वैभव कॉलनी, तांबेपुरा,अमळनेर ) असे मयताचे नाव असून काल सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. गटारीच्या बाजूला सायकल पडलेली असल्याने तोल जाऊन सायकल वरून पडून त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक सुरेश चौधरी, नरेंद्र चौधरी व पराग चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयताचे अमळनेर ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली असा परिवार असून प्रताप सुरेश चौधरी यांचे ते मेहुणे होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button