खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

जाहिरातीच्या पुर्व स्पर्धा परिक्षाची तयारी करा- प्रा.विजय झामरे

अमलनेर (प्रतिनिधी) प्रताप कॉलेज मधील सी सी एम सी विभाग आणि यश पंढरी अकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 जानेवारी रोजी ‘स्पर्धा परिक्षेत ईंग्रजी व्याकरणाचे महत्व’ या विषया संबंधी प्रा.विजय झामरे(औरंगाबाद) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करन्यात आले.प्रस्ताविक श्री पवन लोहार (संचालक,यश पंढरी अकेडमी) यांनी केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ विजय तुन्टे हे होते.समारंभाचे सूत्र संचालन डॉ हर्षवर्धन जाधव यांनी केले
प्रा झामरे यांनी आपल्या सव्वा दोन तासात स्पर्धा परीक्षाची तयारी,वाचन,अभ्यास कसा व कोणता करावा,प्रश्नाचे आकलन कसे करावे,ईंग्रजी व्याकरणाचे सूक्ष्म अध्ययन कसे करावे या संबंधी तपशीलवार माहिती दिली आणि प्रश्न-उत्तर द्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रंसगी बी एस एफ मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करन्यात आले.या प्रसंगी प्रा दिपक पाटील (ग्रंथपाल),डॉ सुभान जाधव,प्रा सी एन मावची,दिलीप शिरसाठ यांच्या सह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.प्रस्तुत कार्यक्रमाचे आभार श्री पवन लोहार यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button