खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

शिरूड येथे गोमातेची वाजत गाजत निघाली अंत्ययात्रा..

अमळनेर (प्रतिनिधी) शिरूड – आयुष्यभर मालकाची सेवा करून त्याला शेतमजूर पासून शेतकरी बनण्यास नशीबवान ठरणाऱ्या वृद्ध गोमातेचे पांग जन्मदात्या आईप्रमाणे फेडले पांग,घरोघरी पूजा करून शिरूड येथील शेतकऱ्याने भजनसह वाजंत्री लावून गोमातेची अंत्ययात्रा काढली यावेळी सुमारे साडे चारशे ते पाचशे ग्रामस्थ हजर होते.

शिरूड येथील पोपट दौलत पाटील हे आधी शेतमजुरी करत होते ३० वर्षांपूर्वी त्यांच्याकडे एक गाय आणली होती या गायीने दूध देऊन मालकाची सेवा केली तसेच तिने आजपर्यंत सुमारे २५ पारडू जन्माला घातले त्यात काही गायी तर काही बैल होते त्यामुळे या कुटुंबाची हळू हळू प्रगती झाली त्यांच्या तिन्ही मुलांचे पक्के घरे झालीत स्वतःची शेती घेतली गेली तिने जन्माला घातलेल्या बछड्यानी देखील प्रौढ झाल्यानंतर म्हणजे वासराचे बैल झाल्यावर त्यांनीही शेतात राबून मालकाची सेवा केली गोमाता आणि पोपट पाटील यांच्या कुटुंबाचे ऋणानुबंध एवढे जुळले होते की लहान मुलांनाही लळा लागला होता शाळेतून आल्यानंतर आधी गायीला चारा पाणी करायचे वृद्धापकाळाने गोमातेचे निधन झाल्यानंतर जणू काही कुटुंबातील सदस्य सोडून गेला इतके दुःख त्या कुटुंबाला झाले म्हणून पोपट पाटील व कुटुंबाने नवे कपडे आणले , बैलगाडी सजवली , जानवे गावाहून बँड मागवला गावातून बैलगाडीवर अंत्ययात्रा काढण्यात आली घरोघरी गोमातेचे पूजा करण्यात आली स्वतःच्या शेतात पूजा करून विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले सुमारे साडे चारशे ग्रामस्थ अंत्ययात्रेला हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button