खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

अमळनेर तालुका टँकर मुक्त करण्यासाठी आ. शिरीष चौधरींचे जोरदार प्रयत्न..

जलस्रोत शोधून सुमारे 35 ते 40 गावांना पाईपलाईन द्वारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन,7 कोटींचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात

अमळनेर(प्रतिनिधी)मतदार संघ दुष्काळी जाहीर झाल्यानंतर सुमारे 35 ते 40 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असताना आ शिरीष चौधरी यांनी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची संकल्पना मांडली आहे,यात 5 ठिकाणी मोठे जलस्रोत निर्माण करून तेथून सुमारे 35 ते 40 दुष्काळी गावांना पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे,7 कोटींचा हा कोटींचा हा प्रस्ताव जि प च्या माध्यमातून शासनदरबारी सादर झाला असून तो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आ शिरीष चौधरी यांनी दिली आहे,या योजनेमुळे तालुका टँकरमुक्त होण्याचे संकेत आमदारांनी दिले आहेत.
यासंदर्भात दि 15 ऑक्टोबर 2018 रोजी प्रताप महाविद्यालयात आ शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टंचाई बैठकीत देखील आ चौधरीं यांनी या योजनेबाबत सूचना केल्या होत्या,योजेची अधिक माहिती देताना आमदारांनी सांगितले की दुष्काळामुळे 35 ते 40 गावांमध्ये बोअर,विहीर अधिग्रहण तथा टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे,यामुळे टँकरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढून शासनाच्या तिजोरीवर याचा परिणाम होत आहे,यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी म्हणून टँकर सुरु असलेल्या गावांच्या परिसरात जलस्रोत शोधून तेथून पाईपलाईन द्वारे त्या गावांना पाणीपुरवठा केल्यास हि गावे टँकरमुक्त होऊन शासनाचा खर्च देखील वाचेल व जनावारांसह ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न सुटेल अशी संकल्पना आम्ही मांडली व हि योजना टंचाई मधून करण्याबाबत पाणी पुरवठा मंत्री ना बबनराव लोणीकर यांच्याशी चर्चा व पत्रव्यवहार देखील केला,त्याचप्रमाणे या योजनेला वेग यावा म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला.यामुळे हि योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आली असल्याचे आमदारांनी सांगितले.

सहा महिन्यांचा टँकरचा खर्च साडेसात कोटी

आ चौधरी यांनी या विषयावर सखोल चर्चा करण्या संदर्भात दिनांक 2 जानेवारी 19 रोजी ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय अभियंता एल पी हिरे, अभियंता एस पी मोरे, डी बी बोरसे यांची बैठक घेतली, यात गंभीर बाब उघडकीस आली ती म्हणजे अमळनेर तालुक्यात गेल्या 6 महिन्याच्या टँकरवर झालेला खर्च हा 7 कोटी 50 लाख एवढा दिसून आला आणि विशेष म्हणजे कायमस्वरूपी टँकरमुक्त करण्याच्या हेतूने राबवल्या जाणाऱ्या पाइपलाइन योजनेचा होणारा खर्च हा 7 कोटी अपेक्षित असून हा खर्च एकदाच होणार आहे, यातून शासनाचा पैसा व वेळ वाचून लोकांची होणारी गैरसोय देखील थांबणार आहे.

अशी असेल ही योजना

जळोद ते गडखाब 11 गावे यासाठी अंदाजित खर्च 1 कोटी 60 लाख असून जळोद डोहातून पाणी घेण्याचे नियोजन आहे,यासाठी मुख्य पाईपचा आकार 160 ते 180 mm राहू शकतो,
25 ते 30 एचपी च्या मोटर्सच्या साहाय्यांने पुढील गावांना 110 mm आकाराच्या पाईपने गांव विहिरीत पाणी पुरवठा केला जाईल.यात खेडी खु प्र ज, पिंपळी प्रज, गडखाब, कचरे,माजर्डी, धुपी, नगाव बु, नगाव खु, देवगाव देवळी, दहीवद खु, दहीवद बु.आदी गावांचा समावेश असेल.
*मुडी ते आर्डी धरण 9 गावे*–यासाठी 1 कोटी 20 लाख खर्च अपेक्षित असून पाझरा नदीलगत 2 विंधन विहिरी खोदकाम करून जलस्रोत निर्माण केला जाईल व तेथून पाईपलाईन टाकून 17 ते 20 hp मोटर्स च्या सहाय्याने शिरसाळे बु, शिरसाळे खु,गलवाडे बु, गलवाडे खु, झाडी,आर्डी-अनोरे, तळवाडे, आटाळे,आदी गावांना पाणीपुरवठा केला जाईल.
*भिलाली ते जैतपीर 9गावे*—यासाठी 1 कोटी 60 लाख खर्च अपेक्षित असून भिलाली ते एकलहरे दरम्यान पांझरा नदिलगत बोअरवेल करून जलस्रोत निर्माण केला जाईल यात मुख्य पाईप लाइन ही भिलाली पासून ते बोरगाव पर्यत असून याअंतर्गत खेडी, खर्दे, वासरे, पाडसे, जैतपीर, भोरटेक, बोरगाव, चौबारी, सबगव्हान आदी गावांना पाणीपुरवठा केला जाईल
डांगर ते शिरूड 5 गावे यासाठी 70 लाख खर्च अपेक्षित असून धुळे जिल्ह्यातील जापी या ठिकाणी मुख्यमंत्री /राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी जागा उपलब्ध करून जलस्रोत निर्माण केला जाईल व तेथून पाईपलाईन टाकून जानवे, इंदापिंप्री, कावपिंप्री, शिरूड,आदी गावांना पाणीपुरवठा होईल.
डांगर ते पिंपळे 9 गावे यासाठी 1 कोटी 50 लाख खर्च अपेक्षित असून यासाठी देखील पेयजल योजनेंतर्गत जागा उपलब्द करून जलस्रोत निर्माण केला जाईल व तेथून पाईपलाईन द्वारे रणाइचे, अंचलवाडी, खडके, वाघोदे, निसर्डी, पिपळें बु, पिंपळे खु, चिमणपुरी, मंगरूळ, आदी गावांना पाणीपुरवठा होईल.

अशी ही अत्यंत अभ्यासपूर्ण व यशस्वी ठरणारी योजना असून लवकरच यास मंजुरी मिळून,कामास तात्काळ सुरुवात होईल व लवकरात लवकर कार्यान्वित देखील होऊन तालुका कोणत्याही परिस्थितीत टँकरमुक्त होईल असा विश्वास आ चौधरी यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button