खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

गटशिक्षणाधिकारी यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ एकवटल्या विविध शिक्षक संघटना

निषेध करून आज प्रांतांना निवेदन देण्यासह करणार काळ्या फिती लावून कामकाज

 

अमळनेर (प्रतिनिधी)  गटशिक्षणाधिकारी यांच्यावर कार्यालयात झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी अमळनेर तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना एकवटल्या आज जाहीर निषेध नोंदवण्यात येणार आहे. दुपारी ठीक 12:45 वाजता पंचायत समिती अमळनेर येथे घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर प्रांताधिकारी व पोलीस निरीक्षक अमळनेर यांना शिक्षक संघटनांकडून निवेदन देण्यात येणार आहे. तसेच आज तालुक्यातील सर्व शिक्षकांनी काळ्या फिती लावून कामकाज करावे आणि आज निषेध करण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अमळनेर तालुका प्राथमिक व माध्यमिक सर्व शिक्षक संघटना यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button