खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर येथील जायन्ट्स ग्रुप ऑफ विरांगना सहेली ऍक्टिव्ह प्रेसिडेंट ऑफ न्यू ग्रुपच्या बहुमानाने सन्मानित

अमळनेर (प्रतिनिधी ) येथील जायन्ट्स ग्रुप ऑफ विरांगना सहेली अमळनेरला  ऍक्टिव्ह प्रेसिडेंट ऑफ न्यू ग्रुपचा बहुमान मिळाला.

धुळे येथील हॉटेल चंद्रदीप रेसिडेन्सी येथे फेडरेशन 2 अ च्या नुतन अध्यक्षा चंद्रकला जगताप व कौन्सिल मेंबराचा शपथविधी झाला. या ठिकाणी जायन्ट्स फेडरेशन-2 अ मधील 2023 च्या मावळत्या अध्यक्ष ऍड.संगीताताई पाटील शहादा यांच्याकडून कामाची दखल घेऊन हे मोमेंटो व प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्व उपाध्यक्ष विजयकुमार चौधरी होते. तसेच जायन्ट्सचे सेंट्रल कमिटी मेंबर रवींद्र जमादार यांची व स्पेशल कमेटी मेंबर, किशोर कुमार मिश्रा ,गोविंदभाई पटेल, बाबुरावजी बगाडे, माजी महापोर जयश्रीताई अहिरराव, माजी महापौर प्रतिभाताई चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. या प्रसंगी अमळनेर जायन्ट्स ग्रुप ऑफ विरांगना सहेली अध्यक्षा अमळनेर दिपीका सोनवणे यांना ऍक्टिव्ह प्रेसिडेंट ऑफ न्यू ग्रुपने सन्मानित करण्यात आले.तसेच सुदर्शना राजमल पाटील यांना बेस्ट काँट्रीब्युशन प्रोजेक्ट याचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित  करण्यात आले.यावेळी ग्रूपच्या उपाध्यक्ष रूपाली पवार, सचिव शोभा पाटील, कोषाध्यक्ष सुनंदा पाटील, सदस्या शालू बोरसे, कमल पाटील व विजया पाटील उपस्थित होत्या.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button