खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

नाट्यकलावंतांना मारझोड करणाऱ्या समाजकंटकांचा आज काँग्रेस व समविचारी संघटना करणार निषेध

अमळनेर (प्रतिनिधी) पुणे येथे नाटकाचा प्रयोग सुरू असताना काही समाजकंटक तेथे येऊन घोषणा बाजी करत कलाकारांना मारझोड केली व महीला कलाकारांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. यात अमळनेर येथील कलाकार असल्याने या घटनेचा अमळनेर ग्रामीण व शहर काँग्रेस कमिटी तसेच समविचारी पुरोगामी संघटनाकडून मंगळवारी निषेध करण्यात येणार आहेत.

याबाबत प्रसिद्ध दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ललित कला अकादमी पुणे येथे नाटकाचा प्रयोग सुरू असताना काही समाजकंटक तेथे येऊन घोषणा बाजी करत कलाकारांना मारझोड केली व महीला कलाकारांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. वरून पोलिस प्रशासनावर सरकारचा दबाव टाकून कलाकार, दिग्दर्शक, विभागप्रमुख यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. त्यात अमळनेर चे कलाकार भावेश राजेंद्र व भुमीका घोरपडे आदी कलाकार होते त्या घटनेच्या व सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करत निवेदन देण्यासाठी दि.६ रोजी  मंगळवारी दुपारी १२ वाजता जुने रेस्ट हाऊस महाराणा प्रताप चौक अमळनेर येथे एकत्र येऊन निषेध व्यक्त करत प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन काँग्रेचे तालुकाध्यक्ष गोकुळ नामदेव बोरसे यांनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button