टेकडी विकासासाठी १० लाखांचा निधी मंजूर केल्याने टेकडी ग्रुप तर्फे सत्कार
अमळनेर( प्रतिनिधी)शहरातील श्री अंबरीश महाराज टेकडीसाठी मंजूर झालेल्या निधीतून श्री अंबरिष महाराज टेकडीवर उत्कृष्ठ सुशोभीकरण करून हे स्थळ एक आकर्षक पर्यटन व धार्मिक स्थळ म्हणून विकसित होणार अशी भावना आ.शिरीष चौधरी यांनी व्यक्त केली.
टेकडी विकासासाठी १० लाखाचा भरघोष निधी आमदार शिरीष चौधरी यांनी मंजूर केल्याने श्री अंबरिष महाराज टेकडी श्रमदान गृप तर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी आमदार चौधरी यांनी सुशोभिकरणासह इतर कामांचे नियोजन कसे केले जाईल याची विस्तृत माहिती दिली.तसेच अमळनेर नगरीत श्री अंबरिष महाराजांची टेकडी एक ऐतिहासिक वास्तू असल्याने हे स्थळ अधिक प्रचलित करण्याचा आपला प्रयत्न असून भविष्यात अजून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून या टेकडीला नाविन्यपूर्ण वैभव प्राप्त केले जाईल अशी ग्वाही आ.चौधरी यांनी दिली.यावेळी मधुकर दुसाने,थोरात आण्णा, आशिष चौधरी, हेमंत पाठक, डाॅ अनिल वाणी, प्रकाश कोतकर,नरेश कांबळे, सुनिल भामरे यावेळी उपस्थित होते..