अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मुडी येथे खून झालेले मयत पुंडलिक चिंधा लकडे वय ४५ व त्याचा चुलत भाऊ काशिनाथ तुकाराम लकडे हे सोंडले तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथील मेंढपाळ असून ते अमळनेर तालुक्यात मेंढ्या चराईसाठी आले होते २० रोजी ते अमळगाव गावी शेतात मेंढ्या चारत होते. सदर दोघांची कुटुंबासह ते त्या दिवशी सहा वाजेच्या सुमारास मूडी गावी कपाशीच्या शेतात होते मयत पुंडलिक चिंधा लकडे हा त्याचा चुलत भाऊ काशिनाथ तुकाराम लकडे त्याला म्हणाला की मी मुडी गावातून फिरून येतो तरी तो रात्री उशिरापर्यंत परत आला नाही त्याला त्याचे कुटुंब व चुलत भाऊ गावात २१ रोजी शोधायला गेले असता गावातील पोलीस पाटील याने सांगितले की आमच्या गावातील अनिल सुका पाटील यांच्या शेतात कोणीतरी धनगर जातीचे मेंढ पाडाचा मृत्यू झालेला आहे, त्यांच्या सांगण्यावरून धनगर कुटुंबाने घटनास्थळी धाव घेतली असता पुंडलिक लकडे हा जखमी अवस्थेत मयत पाहून कुटुंबाने एकच आक्रोश केला. खून झालेल्या पुंडलिक लकडे याला अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार हत्याराने मानेजवळ चेहऱ्यावर मारून मोठ्या जखमा केल्याने जागीच मयत झाला होता. २१ रोजी घटनेची माहिती मारवड पो.ठाणे. स.पो.नि यांना मिळताच त्यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी जाऊन तात्काळ जळगाव येथून फॉरेन्सीक लॅब व श्वानपथक मागवुन गुन्ह्याची तपासाची चक्रे वेगाने फिरवली मयत पुंडलिक लकडे याचा मृतदेह त्याच्या चुलत भाऊ व त्याचे कुटुंबाच्या शेतातील राहण्याच्या ठिकाणापासून ५०० मीटर अंतरावरील अनिल पाटील यांच्या शेतात मिळाल्याने परिसरात उलटसुलट चर्चा सुरू असून काशिनाथ तुकाराम लकडे यांच्या फिर्यादीवरून मारवड पोस्टेला भाग ५ गुन्हा आय.पी.सी. ३०२,२०१, प्रमाणे खुणाचा गुन्हा अज्ञात व्यक्तीविरुद्ध दाखल करण्यात आला असून पुढील तपास मारवडचे स.पो.नि.समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक निलेश शेमडे, व हेड.कॉ भागवत पाटील, प्रकाश चव्हाण,सुनिल अगोणे, संतोष पवार करित आहे.