खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

सारबेटे येथे 48 लाख निधीतून मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेचे आ. शिरीष चौधरींच्या हस्ते भूमिपूजन

आमदार निधीतून पहिल्या आर ओ वॉटर प्युरीफायरचेही थाटात लोकार्पण
अमळनेर( प्रतिनिधी )अमळनेर तालुक्यातील सारबेटे येथे आ.शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नाने 48 लाख निधीतून मंजूर झालेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेचे थाटात भूमिपूजन आ.चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले,याचवेळी आमदार निधीतून दिलेल्या आर ओ वॉटर प्युरीफायर चे लोकार्पण देखील या सोहळ्यात करण्यात आले.
आ.चौधरी यांचे गावात आगमन होताच त्यांचे जल्लोषात स्वागत करून भव्य मिरवणूक काढण्यात आली.व संपूर्ण गावाच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला.,यावेळी प्रास्तविकात उपसरपंच मनोहर पाटील यांनी सारबेटे गावसह मतदार संघातील 29 गावांना मुख्यमंत्री पेयजल योजनेची मंजुरी केवळ आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या सततच्या पाठपुराव्याने मिळालेली असून हे श्रेय फक्त त्यांचेच आहे,सारबेटे गावासाठी त्यांनी नेहमीच विकासाचे योगदान दिले आहे,त्यांनी दिलेल्या पेयजल योजनेमुळे हे गाव टंचाईमुक्त होण्यास मोठी मदत होणार असून यामुळे सारबेटे गाव सदैव त्यांच्या ऋणात राहील अशी भावना व्यक्त केली.तर आ.चौधरी यांनी आपल्या मनोगतात विकास हेच आपले ध्येय असल्याचे सांगून ग्रामिण जनतेला टंचाईतून बाहेर काढण्यासाठी नाला खोलीकरण,जलयुक्त शिवार आदी उपक्रम राबवून अनेक गावात पाणी पुरवठा योजना मंजूर केल्या असल्याचे सांगून तुम्ही फक्त खंबीर साथ द्या संपूर्ण ग्रामिण भाग समस्यामुक्त करून दाखवेल अशी ग्वाही आमदारांनी शेवटी दिली.

पहिल्या आर ओ प्लांट चे लोकार्पण

शहराप्रमाणे ग्रामिण जनतेला देखील आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्वच्छ,थंड व निर्जंतुक पाणी अतिशय अल्पदरात मिळावे यासाठी आ शिरीष चौधरी यांनी आमदार निधीतून अनेक गावात आर ओ वॉटर प्लांट मंजूर केला असून प्रत्येकी 5 लाख निधीतून हा प्लांट उभारला गेला आहे,यातील सारबेटा येथील पहिल्या प्लांट लोकार्पण आ चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गटनेते न.पा. प्रवीण पाठक, कृ.उ.बा समिती अमळनेर चे माजी सभापती साहेबराव पाटील, सारबेटे खु. चे सरपंच श्रावण वंजारी, वसंत वंजारी, नंदाबाई बनसोडे, सुलक्ष्मण सोनवणे, मा.चेअरमन विकासो भानुदास पाटील,सावखेड्याचे माजी सरपंच राजेंद्र पाटील, सुंदरपट्टी सरपंच सुरेश पाटील, ढेकू सरपंच रामकृष्ण पाटील, रडावण सरपंच ढोमन पाटील, सारबेटे बुद्रुक सरपंच कदमखा मेवाती,एकरुखी सरपंच योगेश पाटील, जुनोने माजी सरपंच भगवान पाटील, रडावण मा. सरपंच नामदेव पाटील, संजय पाटील, गोरख पाटील, दिलीप पाटील,भालचंद्र पाटील, रामदास कुंभार, शिवाजी पाटील, विठ्ठल पाटील, दत्तात्रय पाटील, अशोक ब्रह्मे, विजय ब्रह्मे, रवींद्र साळवे, विकास पाटील, निळकंठ पाटील, प्रवीण पाटील, एकनाथ ब्रह्मे, विशाल पाटील, राजेंद्र पाटील, रामकृष्ण पाटील, ज्ञानेश्वर ब्रम्हे, वाल्मीक पाटील, भास्कर पाटील, गुलाब पाटील, संजय पाटील, भागवत पाटील, महेश ब्रम्हे,यासह शिरीषदादा मित्र परिवाराचे सदस्य व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button