खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

सानेगुरुजी ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय , टाऊन हॉल यांचे परिसर सुशोभीकरण व अद्ययावत रस्ते करा

संबंधित संस्थाच्या पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी न.पा. मुख्याधिकारी यांच्याकडे केली मागणी

 

अमळनेर (प्रतिनिधी) येथे फेब्रुवारीत होणाऱ्या अ.भा.मराठी व विद्रोही साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर वाङ्मय व साहित्यिक सांस्कृतिक चळवळीचे साक्षीदार पू. सानेगुरुजी यांचा अर्बन बँकेसमोरील पुतळा सुशोभित करण्याबरोबरच सानेगुरुजी ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय , टाऊन हॉल यांचे परिसर सुशोभीकरण व अद्ययावत रस्ते नगरपरिषदेने करून द्यावे, अशी मागणी संबंधित संस्थाच्या पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे. यासंदर्भात न.प.मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर ही सानेगुरुजींची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते. अमळनेर येथे  २ ते ४ फेब्रुवारी २०२४ रोजी संपन्न होणाऱ्या अ.भा.मराठी साहित्य संमेलन तसेच १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर भारतातील,व राज्यातील नामवंत साहित्यिक,वाचक, श्रोते भेट देतील म्हणून नगरपालिकेने अर्बन बँकेसमोरील सानेगुरुजी पुतळा अद्ययावत व सुशोभित करणे सुरू केले आहे. त्याचप्रमाणे दीड शतकापासून वांडमयीन व साहित्यिक, सांस्कृतिक चळवळीचे साक्षीदार राहिलेले पू. सानेगुरुजी ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय , टाऊन हॉल म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असलेले लोकमान्य स्मारक समिती सभागृह यांचे खान्देशच्या साहित्यिक व वांड;मयिन इतिहासात महत्वाचे स्थान आहे. सदर परिसरात पू. सानेगुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्र चालविले जाते जिथे राज्यभरातील आय एस व आयपीएस अधिकारी येत असतात.म्हणून अमळनेर नगरपरिषदेने पू.सानेगुरुजी ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय , टाऊन हॉल  येथिल परिसर सुशोभीकरण व अद्ययावत रस्ते सुविधा नगरपरिषदेने उपलब्ध करून द्यावे  अशी मागणी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे  यांचेशी चर्चा करून दिलेल्या निवेदनातून यावेळी लोकमान्य स्मारक समितीचे चिटणीस प्रा.डॉ.प्र.ज. जोशी, पू. सानेगुुरूजीं ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालयाचे सचिव प्रकाश वाघ,अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे यांनी केली. याप्रसंगी न.प.चे प्रशासन अधिकारी संजय चौधरी,न.प.शिक्षण मंडळाचे लिपिक सुनिल पाटील हे उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button