खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी..* *”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर*

 

(Q 1) *स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या वतीने गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?*

 

Ans-  अमर हबीब

 

(Q२) *भारतीय नौसेनेच्या वतीने यावर्षीचा नौसेना दीन कोठे साजरा करण्यात येणार आहे?*

 

Ans-  सिंधूदुर्ग किल्ला

 

(Q३) *महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे साजरा करण्यात येणाऱ्या नौदल दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित राहणार आहे?*

 

Ans-  नरेंद्र मोदी

 

(Q४) *महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्गाच्या समुद्र किनारी राजकोट येथे कोणाचा पुतळा उभारण्यात आला आहे?*

 

Ans- छत्रपती शिवाजी महाराज

 

(Q५) *महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समुद्र किनारी राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा किती फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे?*

 

Ans-  ४३

 

(Q६) *सिंघुदुर्ग किल्ल्याच्या समुद्र किनारी राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण नौसेना दिनी कोणाच्या हस्ते करण्यात येणार आहे?*

 

Ans-  नरेंद्र मोदी

 

(Q७) *भारत हा जगातील कितवा देश आहे जिथे कामाचे तास जास्त आहेत?*

 

Ans-  सातवा

 

(Q८) *भारतात दर आठवड्याला कामाचे तास किती आहेत?*

 

Ans-  ४७.७

 

(Q९)  *जगात सर्वाधिक कामाचे तास कोणत्या देशात आहेत?*

 

Ans-  युएई

 

(Q१०)  *जगात सर्वाधिक कामाचे तास युएई मध्ये आठवड्याला किती आहेत?*

 

Ans-  ५२.६

 

🔷 चालू घडामोडी :- 26 नोव्हेंबर 2023

 

◆ ‘खेलो इंडिया पॅरा-गेम्स 2023’ ची पहिली आवृत्ती 10 ते 17 डिसेंबर दरम्यान नवी दिल्ली येथे होणार आहे.

 

◆ माजी क्रिकेटपटू सौरभ गांगुली याला पश्चिम बंगाल राज्याचा ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्यात आले आहे.

 

◆ संयुक्त अरब अमिराती (UAE) ने जगातील सर्वात मोठ्या ‘सिंगल साइट सोलर पॉवर प्लांट’चे उद्घाटन केले आहे.

 

◆ भारताचा अनुभवी क्यू खेळाडू पंकज अडवाणी याने 26 व्यांदा ‘वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप 2023’ चे विजेतेपद पटकावले आहे.

 

◆ दक्षिण आफ्रिका अंडर-19 क्रिकेट विश्वचषक 2024 चे आयोजन करणार आहे.

 

◆ विनय एम. टोन्से यांची स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

◆ मायक्रोसॉफ्टने अपर्णा गुप्ता यांची कंपनीच्या नवीन ग्लोबल डिलिव्हरी सेंटर लीडर म्हणून नियुक्तीची घोषणा केली आहे.

 

◆ ‘डॉ. अजय कुमार सूद यांची नाबार्डच्या उपव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

◆ प्रसिद्ध मल्याळम कादंबरीकार पी वलसाला यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले.

 

◆ दीप्ती बबुता पंजाबी साहित्यासाठी धहान पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.

 

◆ उत्तर प्रदेश राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘सेफ सिटी प्रोजेक्ट’ सुरू केला आहे.

 

◆ जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील केशराला जीआय टॅग मिळाला आहे.

 

◆ भारतीय नौदल आणि DRDO ने पहिल्या स्वदेशी नौदल अँटी शिप क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे.

 

◆ ‘जोसेफ बोकाई’ यांनी लायबेरियाच्या नवीन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे.

 

◆ नोव्हाक जोकोविचने विक्रमी 7व्यांदा एटीपी फायनल्सचे विजेतेपद पटकावले आहे.

 

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

✍️ माहिती संकलन :- खबरीलाल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button