खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
संपादकीय

*स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी..* *”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर*

 

📝 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*

 

– *25 नोव्हेंबर 2023*

Q.1) पश्चिम बंगालचा ब्रँड अँम्बेसेडर म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

✅ *सौरव गांगुली*

Q.2) अलाहाबाद उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

✅ *मनोज कुमार गुप्ता*

Q.3) आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे?

✅ *वीर दास*

Q.4) 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?

✅ *अनुराग ठाकूर*

Q.5) भारत आणि कोणत्या देशामध्ये ‘वज्र प्रहार’ हा लष्करी सराव आयोजित केला जातो?

✅ *युएसए*

Q.6) आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टच्या 11 व्या आवृत्तीच्या आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे?

✅ *मेघालय*

Q.7) ब्रजराज उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो?

✅ *उत्तर प्रदेश*

Q.8) ‘अटल इनोव्हेशन मिशन’ने सर्क्युलर इकॉनोमी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे?

✅ *ऑस्ट्रेलिया*

Q.9) जागतिक प्रतिभा स्पर्धात्मक निर्देशांक 2023 मध्ये भारताची रँक कितवी आहे?

✅ *103 वी*

Q.10) जागतिक मत्स्यपालन दिवस कधी साजरा केला जातो?

✅ *21 नोव्हेंबर*

 

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

 

🛑 *विश्वचषक 2023 नंतर ICC ने आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमात केले मोठे बदल  :-*

 

👉 ट्रान्सजेंडर खेळाडूंना आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये स्थान नाही

 

👉 निलंबनानंतरही श्रीलंका क्रिकेट संघास आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास परवानगी

 

👉 अंडर – 19 विश्वचषक 2024 चे यजमानपद श्रीलंका या देशात न ठेवता दक्षिण आफ्रिकेत ठेवले आहे

 

👉 आंतरराष्ट्रीय लढतीसाठी कार्यरत पुरुष व महिला अधिकाऱ्यांना आता समान मानधन मिळेल

 

👉 एका डावात तीन वेळा 60 सेकंदाची मर्यादा ओलांडल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पाच धावांचा दंड

 

✔️आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची बैठक अहमदाबाद या ठिकाणी पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत आणि काही नियम नव्याने बनवण्यात आले आहेत.

 

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

 

(Q 1) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या वतीने गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

 

Ans-  अमर हबीब

 

(Q२) भारतीय नौसेनेच्या वतीने यावर्षीचा नौसेना दीन कोठे साजरा करण्यात येणार आहे?

 

Ans-  सिंधूदुर्ग किल्ला

 

(Q३) महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे साजरा करण्यात येणाऱ्या नौदल दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित राहणार आहे?

 

Ans-  नरेंद्र मोदी

 

(Q४) महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्गाच्या समुद्र किनारी राजकोट येथे कोणाचा पुतळा उभारण्यात आला आहे?

 

Ans- छत्रपती शिवाजी महाराज

 

(Q५) महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समुद्र किनारी राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा किती फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे?

 

Ans-  ४३

 

(Q६) सिंघुदुर्ग किल्ल्याच्या समुद्र किनारी राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण नौसेना दिनी कोणाच्या हस्ते करण्यात येणार आहे?

 

Ans-  नरेंद्र मोदी

 

(Q७) भारत हा जगातील कितवा देश आहे जिथे कामाचे तास जास्त आहेत?

 

Ans-  सातवा

 

(Q८) भारतात दर आठवड्याला कामाचे तास किती आहेत?

 

Ans-  ४७.७

 

(Q९)  जगात सर्वाधिक कामाचे तास कोणत्या देशात आहेत?

 

Ans-  युएई

 

(Q१०)  जगात सर्वाधिक कामाचे तास युएई मध्ये आठवड्याला किती आहेत?

 

Ans-  ५२.६

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

 

*ग्रहांविषयी माहिती*

 

*बटुग्रह –* सन 2006 पर्यंत प्लूटो या ग्रहास सूर्यमालिकेत नवव्या ग्रहाचे स्थान दिले होते. परंतु; आंतरराष्ट्रीय खगोल समितीने परीभ्रमणाबाबत केलेल्या नवीन नियमानुसार प्लूटोचे परिभ्रमन ग्रह नसल्यामुळे त्यास बटुग्रह असे नाव देण्यात आले आहे.

 

*लघुग्रह –* मंगळ आणि गुरु या ग्रहाच्या दरम्यान असलेल्या ग्रहाच्या पटयाला लघुग्रह असे म्हणतात.

 

*अंर्तग्रह –* बूध ते मंगळ या ग्रहांना अंर्तग्रह असे म्हणतात.

 

*बर्हिग्रह –* गुरुनंतरच्या इतर ग्रहांना बर्हिग्रह असे म्हणतात.

 

*धूमकेतू –* सूर्याभोवती लंबकार कक्षेत फिरणार्‍या, जास्त परिभ्रमन काळ असलेल्या खगोलीय वस्तूला धूमकेतू म्हणतात.

 

*उल्का –* जेव्हा एखादी खगोलीय वस्तू पृथ्वीच्या जवळ येते आणि ती पृथ्वीच्या गुरुत्वीय बळामुळे पृथ्वीकडे खेचली जाते. अशी वस्तू पृथ्वीच्या वातावरणातून पृथ्वीकडे येत असतांना वातावरणाशी घर्षण होवून ती जळते व प्रकाश निर्माण होतो. याला उल्का असे म्हणतात.

 

🪀 *सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा..👇🏻*

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button