अमळनेर (प्रतिनिधी ) अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसची आढावा बैठक पार पडली. यावेळी आगामी येऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसतर्फे “युथ जोडो बुथ जोडो” या कार्यक्रमाचे अनावरण करण्यात आले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आपले स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्ष विचार,पक्षाची ध्येय धोरणं ,देशातील व समाजातील तळागाळाच्या लोकांपर्यंत पोचविण्यासाठी तसेच विद्यमान केंद्र व राज्य सरकारच्या जुल्मी धोरणांविरोधात आवाज उठविण्यासाठी “युथ जोडो बुथ जोडो” कार्यक्रमाच्या माध्यमातून संकल्प करत आहे. या असंवेदनशील सरकारच्या विरोधात सर्व नागरिकांनी एकत्र येऊन लढा देण्याचा निर्धार या प्रसंगी “युथ जोडो बुथ जोडो” च्या माध्यमातून करण्यात आला.
तसेच तुषार संदानशिव यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल ,आसिफ छोटु बागवान यांची काँग्रेस शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल, शिरसाळे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी सौ माधुरी दीपक सुर्यवंशी या भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल त्यांचे प्रतिनिधि म्हणून युवक काँग्रेसचे सागर सुर्यवंशी यांचा व मराठा आरक्षणासाठी तीन दिवस अन्नत्याग करणाऱ्या हर्षल जाधव यांचा देखील युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याबरोबरच पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आली.यावेळी अमळनेर युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश पाटील, शहराध्यक्ष तौसिफ तेली, माजी जिल्हासचिव हर्षल जाधव, मयूर पाटील, पंकज पाटील, अल्पसंख्याक सेल तालुका उपाध्यक्ष राजेंद्र भाट, मनोहर पाटील, गौरव देशमुख, कुणाल चौधरी,नरेंद्र पाटील, सोपान पाटील,प्रदीप ठाकरे, ज्ञानेश्वर कोळी, हर्षल पाटील, मयुरेश पाटील,तौसिफ बागवान, अक्षय पाटील, सागर सुर्यवंशी, जयेश पाटील, गौरव पाटील, प्रमोद पाटील,गौरव अहिरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत भैय्या ओगले, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार, जळगाव जिल्हा युवक काँग्रेस प्रभारी आनंद पुरोहित, प्रदेश महासचिव किरण पाटील, प्रदेश सचिव आशुतोष पवार , प्रदेश सचिव तुषार संदानशिव, जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे ह्यांच्या सुचनेनुसार व अमळनेर काँग्रेस तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे,शहराध्यक्ष मनोज पाटील,जेष्ठ नेते के डी पाटील, जेष्ठ नेते बी के सुर्यवंशी, काँग्रेस शहर उपाध्यक्ष आसिफ बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली.