अमळनेर (प्रतिनिधी) वडील सायंकाळी मंदिरात गेल्यावर दहावीतील मुलीला पळवून नेल्याची घटना तालुक्यातील नगाव बु. येथे घडली.मुलीच्या वडिलांनी अमळनेर पोलीसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी याबाबत दिलेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील नगाव बु. राहणारी १४ वर्षीय मुलगी इयत्ता दहावीत शिकत असून तिची आई मयत असल्याने वडिलांसोबत राहत होती. दिनांक ५ रोजी सायंकाळी वडील हे मंदिरात गेले असता मुलगी एकटी घरी होती. रात्री पावणे आठ वाजता ते परत आले असता मुलगी दिसून न आल्याने त्यांनी आजूबाजूला विचारपूस केली. तसेच नातेवाईकांकडे विचारणा केली मात्र कोणताच तपास न लागल्याने त्यांनी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार अमळनेर पोलीसात दिली आहे. पुढील तपास हेकॉ संदेश पाटील हे करीत आहेत.