खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

आदिवासी विद्यार्थ्यांना तालुकास्तरावर आता मिळणार स्वयंम योजनेचा लाभ

नाशिक आदिवासी विकास विभाग सहा. आयुक्त जाधव यांची माहिती

 

अमळनेर (प्रतिनिधी) आदिवासी विद्यार्थ्यांना आता तालुकास्तरावर स्वयंम योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती नाशिक आदिवासी विकास विभाग सहा. आयुक्त अरुणकुमार जाधव यांनी दिली. त्यांचे सहकारी  सहा. प्रकल्प अधिकारी नाशिक विभागाचे सूर्यभान सूडके आदींनी येथील पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली. ही भेट शासन आपल्या दारी अश्या स्वरूपात होती. याप्रसंगी आदिवासी विद्यार्थी यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा केली.

तालुका स्तरावर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या पण वसतिगृह न मिळालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना स्वयंम योजना लाभ मिळणार आहे. ऑनलाईन अर्ज पोर्टलवर भरणेची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली. यासाठी गरजू विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन नाशिक आदिवासी विभागाचे सहाय्यक आयुक्त अरुणकुमार जाधव यांनी केले. या भेटीप्रसंगी समाजकार्य महाविद्यालय येथे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, प्रा. विजयकुमार वाघमारे, प्रा. ढगे, डॉ. जगदीश सोनवणे, डॉ. भरत खंडागळे, डॉ. अनिता खेडकर, डॉ. श्वेता वैद्य, डॉ. सागरराज चव्हाण आणि कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button