अमळनेर (प्रतिनिधी) न्यू प्लॉट परिसर विकास मंच नवरात्रोत्सव मंडळांच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा दसऱ्याच्या दिवशी उत्साहात पार पडला. पडले.यावेळी मंडळास सहकार्य करणाऱ्या विविध संस्था व मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात आयोजित या नवरात्रोत्सवात संपूर्ण दहा दिवस रास गरबा सह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. अखेरच्या तीन दिवसात महिला व मुलींसाठी रास गरबा स्पर्धा तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी लिंबू चमचा व संगीत खुर्ची आदी स्पर्धा पार पडल्या.सर्व स्पर्धाना मुले,मुली व महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.सदर स्पर्धेसाठी जैन जागृती सेंटर,पारस गोल्ड,गेलेक्सि स्टोअर,किशोर प्रोव्हिजन व न्यू प्लॉट विकास मंच आदी बक्षिसाचे प्रायोजक होते.तर परीक्षक म्हणून सौ विपुला नांढा, गार्गी गोहिल व नयना कुळकर्णी यांनी काम पाहिले.दसऱ्याच्या दिवशी सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते पार पडले.यावेळी मंडळास सहकार्य जाणाऱ्या विविध संस्था व मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला.यावेळी महावीर पतपेढीचे चेअरमन प्रकाशचंद्र पारेख,खा. शि.मंडळाचे माजी कार्याध्यक्ष जितेंद्र जैन,पर्यंककुमार पटेल,प्रेम शाह,सुभाष चौधरी,प्रीतपालसिंग बग्गा,डॉ संजय शाह,राजकुमार बितराई, प्रसाद शर्मा, ऍड.विवेक लाठी, दिनेश मणियार,अनिल रायसोनी,बिपीन पाटील, जयदीप राजपूत,डॉ संदीप सराफ,माजी प्राचार्य डॉ पी. आर. शिरोडे,गोपाल अग्रवाल,अजय सोनार,विजय सोनार,रघुनाथ पाटील, बिपीन पाटील, विरू वाधवाणी,डॉ सुमित पाटील,कैलास केदार यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन न्यू प्लॉट परिसर विकास मंचचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी केले.तर स्पर्धेसाठी छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप,महाराणा प्रताप मित्र मंडळ,न्यू प्लॉट महिला मंच, जैन जागृती सेंटर, लिओ क्लब, सौरभ केरटर्स, राजेशहाजी मित्र मंडळ,टिळक मित्र मंडळ व परिसरातील नागरिकांचे सहकार्य लाभले.