खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

जळोद येथील तलाठ्याने चक्क तापी नदीवरील अवैध वाळू वाहतुकीचा रस्ताच काढला खोदून

तहसीलदारांच्या दुर्लक्षामुळे तालुक्यात अवैध वाळू, गौण खनिज वाहतूक बोकाळली

 

अमळनेर (प्रतिनिधी) तहसीलदारांच्या दुर्लक्षामुळे तालुक्यात अवैध वाळू, गौण खनिज वाहतूक चांगलीच बोकाळली आहे. त्यामुळे प्रामाणिकणे काम करणाऱ्या काही अधिकारी व कमर्चाऱ्यांना त्रासाला सामोरो जावे लागत आहे. तर जळोद येथील तलाठ्याने तापी नदीवरून अवैध वाळू वाहतुकीचा रस्ताच खोदून काढल्याने वाळू चोरीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले आहे. मात्र वाळू चोरटे यावरही उपाय शोधून काढतील म्हणून महसूल यंत्रणेने गाफील राहू नये, अमळनेर तालुक्यातील जळोद हे गाव तापी नदीच्या  खोऱ्यात वसले असून या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक होत असते. वाळू चोर शिरजोर झाल्याने त्यांना पकडणे जवळजवळ अशक्य झाले आहे. वाळू चोरांच्या तुलनेत प्रशासनाकडे मनुष्य बळ अपूर्ण पडत आहे. म्हणून तलाठी जितेंद्र पाटील याने शक्कल लढवली.  कोतवाल प्रवीण शिरसाठ याच्या मदतीने तापी नदीकडून  गावाकडे  येणारा रस्ताच खोदून काढला. त्यामुळे अवैध वाळू वाहतुकदारांची कोंडी झाली आहे. रस्ता पूर्णपणे बंद झाल्याने एकही वाहन नदीवर जाऊ शकत नाही. परिणामी चोरी पूर्णपणे थांबली आहे. यानंतर जे वाळू वाहतूकदार रस्ता बुजवण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर गुन्हा दाखल करणार आहेत.

 

सिस्टिमध्येच काही करपटेड

 

महसूलचे पथक पकडायला निघाले तर वाळू चोरांचे खबरी लगेच खबर देत असल्याने ते सावध होऊन नदी पात्रातून पळ काढतात. एखादा प्रामाणिक तलाठी आणि गावातील कोतवाल काहीच करू शकत नाहीत. एखादे ट्रॅक्टर सापडले तर वाळू चोर धक्काबुक्की ,दादागिरी करून पळून जातात. वेळप्रसंगी जीवावर बेतते. रात्री अपरात्री, २४ तास महसूल कर्मचारी पाळत ठेवू शकत नाही. विशेष म्हणजे काही तलाठीच या अवैध वाळू व्यवसायत गुंतले आहेत. त्यांचे डंपर, ट्रॅक्टर आहेत. त्यामुळे कार्यालयातूनही काही ठिकाणी बाब फुटत असल्याने वाळू चोरट्यांचे चांगलेच फावते. मात्र काही प्रामाणिकही तलाठी आहेत. ते इमाने इतबारे काम करीत आहेत. पण जे सिस्टिमध्ये करपटेड आहेत. त्यांच्यावर तहसीलदार अंकुश ठेवतील का, असा प्रश्न आहे. तर खबरीलाल पुराव्याशिवाय काहीच बोलत नाही. त्यामुळे तहसीलदारांनी अव्हान दिल्यास पुराव्यानिशी कोणता तलाठी यात आहे, त्याची कोणती वाहने आहेत, हे सिद्ध करून देण्यास तयार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button