खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

पिंपळे बु. येथील आश्रमशाळेत “राष्ट्रीय क्रीडा दिवस” उत्साहात साजरा

हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळे बु. येथील श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित, यशवंत माध्य व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेत हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त”राष्ट्रीय क्रीडा दिवस” उत्साहात साजरा करण्यात आला.
हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे व विविध खेळातील साहित्याचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक उदय पाटील व प्रमुख पाहुणे उदय गुलाबराव पाटील, चेतन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी क्रीडा शिक्षक स्वप्नील एच.पाटील यांनी विद्यार्थ्यांना मेजर ध्यानचंद यांच्या कार्याविषयी माहिती दिली. क्रीडा समिती मार्फत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अमळनेर शहरातील भद्रा प्रतिक फर्निचर, इलेक्ट्रॉनिक मॉलचे संचालक प्रताप साळी, दीपक साळी व अक्षय साळी यांच्या सौजन्याने आश्रमशाळेतील खेळाडूंना एकूण 30 टी-शर्ट प्राप्त झाले. व मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना वाटप करण्यात आले. यासाठी उच्च माध्यमिक शिक्षक स्वप्नील एच.पाटील, हेमंत पाटील व माधुरी पाटील यांनी मेहनत घेतली. तसेच कार्यक्रमाचे छायांकन प्रवीण पाटील यांनी केले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त संस्थेच्या अध्यक्षा विद्याताई पाटील व सचिव युवराज पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. टी- शर्ट उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री भद्रा प्रतीक मॉलचे संचालक यांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button