अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील धार येथे भरलेल्या येथील यात्रेतून मोटारसायकल लंपास केल्याची घटना २४ रोजी घडली. याप्रकरणी मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील तांबेपुरा, विप्रो कॉलनी भागातील रहिवाशी शेख मुक्तार शेख निजाम हे २४ रोजी दुपारी धार येथील यात्रेसाठी २० हजार रुपये किंमतीच्या स्प्लेंडर कंपनीच्या एम.एच.१९ सिटी ५७७५ या गाडीने गेले होते.शेख मुक्तार हे गाडी लावून यात्रेत गेले मात्र यात्रेतून परत आल्यावर लावलेल्या जागी मोटारसायकल दिसून आली नसल्याने मोटारसायकल चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. मोटारसायकल चोरीप्रकरणी अज्ञाताविरुद्ध मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.