जुनवणे येथे सख्या चुलत भावांमध्ये शेतीच्या सामाईक बांधावरून उफाळला वाद

सात जणांनी लोखंडी वस्तूने दोघांच्या डोक्यावर मारून केले रक्त बंबाळ

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जुनवणे येथे सख्या चुलत भावांमध्ये शेतीच्या सामाईक बांधावरून वाद निर्माण होऊन सात जणांनी लोखंडी वस्तूने दोघांच्या डोक्यावर मारून रक्त बंबाळ केल्याची घटना २३ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सातही जणाविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, जुनवणे येथील मनोज मुखत्यारसिंग पाटील यांचे व त्यांच्या चुलत भाऊ, काका, काकू यांच्याशी शेतीच्या सामायिक बांधावरून वाद सुरू होते. २१ जुलै रोजी गावकऱ्यांनी त्यांच्यात समजोता घडवून आणला होता. २३ रोजी रात्री १० वाजता मनोज पाटील आपल्या कुटुंबासह घरात झोपले असता अनिल श्यामसिंग पाटील , सुनील श्यामसिंग पाटील , त्यांचे मेव्हणे प्रवीण सुभाष पाटील , भूषण प्रवीण पाटील, प्रमोद सुनील पाटील आणि दोन अनोळखी इसम घरचा दरवाजा तोडून घरात घुसले आणि सुनील याने हातातील लोखंडी पास ने मनोज यांचा मुलगा सागर याच्या डोक्यावर वार केला. त्यांनतर अनिल ने लोखंडी सळीने मारहाण केली. भांडण आवरायला गेल्यानन्तर त्याने मनोज च्या डोक्यात जोराने सळीने मारहाण केली. तसेच मुखत्यारसिंग यालाही लाकडी दांडक्याने मारहाण केली. घरातील सामानाची नासधूस केली. गावकऱ्यांनी भांडण आवरले. त्यानंतर मनोज आणि सागर याना जखमी अवस्थेत उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना धुळे येथे हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दवाखान्यात जखमींचा जबाब घेतल्यानन्तर अमळनेर पोलीस स्टेशनला सातही जणाविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *