खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

शेतीच्या कामासाठी दिलेल्या पैशावरून कलाली येथे वकिलाची पकडली गचांडी

अमळनेर (प्रतिनिधी ) शेतीच्या कामासाठी दिलेल्या पैशावरून तालुक्यातील कलाली येथे वकिलाची गचांडी पकडुन सोन्याची चेन हिसकावत धक्काबुक्की करणाऱ्या एकावर मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील कलाली येथील ॲड. पद्माकर पाटील यांच्याकडून सुदाम भगवान भील याने पैसे घेतले होते. सुदाम याने ते पैसे परत केले नाहीत तसेच तो शेतीच्या कामाला ही येत नसल्याने अॅड. पाटील यांनी त्यास विचारपूस केली असता त्याचा राग येवून त्याने त्यांना शिवीगाळ करून तुझी वकिली तिकडे दाखव, मी कोर्ट कचेरीस घाबरत नाही असे सांगत चापटबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या गळ्यातील ७ ग्रॅम वजनाची ३५ हजार किमतीची सोन्याची चेन हिसकावून घेतली. त्यावरून मारवड पोलिसांत सुदाम भगवान भील याच्याविरुद्ध भादवि कलम ३९२, ३२३, २९४, ५०४, ५०६ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय विनोद पाटील हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button