खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

रेशनचा गहु व तांदुळावर डल्ला मारणारे सागर वाणी आणि विपीन जैन यांचा बाजार समितीचा परवाना निलंबित

कारवाईत रेशनचा चार क्विंटल गहू आणि आठ क्विंटल तांदूळ खरेदी केल्याचे उघड

अमळनेर (प्रतिनिधी) रेशन दुकानदारांकडून गरिबांचा गहू आणि तांदूळ विकत घेऊन अन्य व्यापाऱ्यांना जादा भावात विकून काळाबाजार करणारे सागर वाणी आणि विपीन जैन या दोन व्यापाऱ्यांचे प्रमाणे
कृषी उत्पन्न बाजार समितीने तात्पुरते निलंबित केले आहेत. याचाच अर्थ अमळनेरात रेशनचा काळाबाजार अद्यापही सर्रास सुरू असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या दोन्ही व्यापाऱ्यांचे परवाने कायमचेच रद्द करून अन्य रेशनचा काळाबाजार करणाऱ्यांना चपराक द्यावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरंकडून व्यक्त केली जात आहे
अमळनेर बाजार समितीत सागर वाणी या व्यापाऱ्याने रेशनचा चार क्विंटल गहू आणि आठ क्विंटल तांदूळ खरेदी करून आणले असल्याची माहिती नायब तहसीलदार संतोष बावणे यांना मिळाल्यावरून बाजार समितीत येऊन बावणे ,सचिव डॉ उन्मेष राठोड सहसचिव अशोक वाघ ,सुनील पाटील , सुनील सोनवणे , योगेश इंगळे ,गणेश पाटील यांनी पंचनामा केला. सागर वाणी याने हा माल विपीन जैन यांच्याकडून घेतल्याचे बावणे यांनी सांगितले. अमळनेर तालुक्यात तांदळाचे उत्पादन होत नसल्याने बाजार समितीत खरेदी विक्री होत नाही म्हणून हा माल रेशनचा असल्याचा संशय आल्याने बाजार समितीने सागर वाणी यांचा व्यापारी परवाना निलंबित केला आहे. महसूल विभागातर्फे देखील चौकशी करून दोघं व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे बावणे यांनी सांगितले.

सागर वाणी असा करतो रेशनचा माल गोळा

सागर वाणी हा आपल्या छोटा हत्ती गाडीतून अमळनेर शहर व तालुक्यातील रेशन दुकानदारांकडे जाऊ उपलब्ध असलेले गहू आणि तांदळाचे कट्टे गोळा करतो. एकाच फेरीत 50 ते 60 कट्टे मला गोळा करतो. या मालाचे पैसे तो रेशन दुकानदारांना रोकडा देत असल्याने लगेच पैसे सुटतात, म्हणून रेशन दुकानदार त्यालाच काळा बाजारात रेशनचा गहू आणि तांदूळ विकतात. तो हा माल बाजार समिती एकत्र एकत्रित करत पारोळा धरणगाव आणि अन्य ठिकाणी व्यापाऱ्यांना तो पुरवत असतो. सुरुवातीपासूनच त्याचा हा काळा धंदा तेजीत आहे. त्यामुळे त्याने आतापर्यंत किती महाल खरेदी करून तो काळाबाजार विकला आहे याचीही चौकशी होऊन त्याचा परवाना कायमस्वरूपी निलंबित करण्याचे धाडस बाजार समिती आण तहसील कार्यालयाने केले तरच गरिबांच्या गहू आणि तांदुळावर डल्ला मारणाऱ्या गिधाडांचे पंख छाटले जातील, असा सूर सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे

तहसीलदार प्रांत झोपत होतात काय?

अमळनेर शहर व तालुक्यात रेशनचा काळाबाजार सुरू असल्याचे ‘खबरीलाल’ने अनेकदा पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. मात्र तहसीलदार आणि प्रांताकडून कारवाई होत नसल्याने सागर वाणी व विपीन जैन सारख्या गिधाडांकडून गोरगरिबांच्या गहू आणि तांदळावर वर्षानुवर्ष डल्ला मारणे सुरूच आहे. हे सारे सुरू असताना तहसीलदार आणि प्रांत झोपा जोडतात काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करू लागला आहे. यापुढे तरी किमान डोळ्यात तेल घालून रेशनचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता तहसीलदार आणि प्रांत घेतील अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button