खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

नियंत्रण सुटल्याने धार मालपूरकडे जाणारी कार झाडावर आदळल्याने एक जण जागीच ठार

दोघांचे पाय फ्रॅक्चर होऊन गंभीर जखमी, लहान मुलाला साधे खरचटले सुद्धा नाही

अमळनेर (प्रतिनिधी) नियंत्रण सुटल्याने मालपूरकडे जाणारी कार झाडावर आदळल्याने एक जण जागीच ठार झाला. तर दोघांचे पाय फ्रॅक्चर होऊन गंभीर जखमी झाल्याची घटना ११ रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश पांडुरंग पाटील( रा. मालपूर) हा कुलदीप विकास पाटील व त्याचे मेव्हणे (नाव माहीत नाही) ,आणि एक लहान मुलगा घेऊन मालपूरकडे कार घेऊन निघाला होता. नियंत्रण सुटल्याने हॉटेल चिन्मय जवळ कार झाडावर आदळल्याने योगेश जागीच ठार झाला. इतर दोघांचे पाय फ्रॅक्चर झाले. लहान मुलाला मात्र साधे खरचटले सुद्धा नाही. डॉ इम्रान कुरेशी यांनी प्राथमिक उपचार करून जखमींना रुग्णालयात दाखल केले.उशिरापर्यंत पंचनामा व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button