खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

रोटरी क्लब व आधार संस्थेतर्फे एचआयव्हीसह जगणाऱ्या मुला, मुलींना सकस आहार वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) रोटरी क्लब अमळनेर व आधार बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्हीसह जगणाऱ्या मुलां मुलींना सकस आहार वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रोत्सान निधी दाता रोहन साळुंखे होते. त्यांनी किराणा कीट देऊ केले व व श्री पुनम कोचर यांनी मुला मुलींसाठी 30 प्रोटीन किट उपलब्ध करून दिले पुनम भाऊ यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त या गरजू मुलांना वाटप करण्यात आले. व या कार्यक्रमासाठि आधार संस्थेचे अध्यक्षा डॉ. भारती पाटील व कार्यकारी संचालक रेणू प्रसाद रोटरी क्लबचे नवनिर्वाचित प्रेसिडेंट प्रतीक भाऊ जैन व सेक्रेटरी देवेंद्र कोठारी रोटरी क्लब सदस्य चेलाराम सैनानी, राजेश जैन, रोहित सिंघवी, विवेक देशमुख वृषभ पारेख, ईश्वर सैनानी , किर्ती कुमार कोठारी व आधार संस्थेतील कर्मचारी तौसिफ शेख पुनम पाटील नंदनी मैराळे मोहिनी पाटील ज्ञानेश्वरी पाटील या लोकांनी कार्यक्रम घडवण्यासाठी परिश्रम घेतले व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कापडे यांनी केले. आभार पुरुषोत्तम ढमाळ यांनी मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button