खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

शासन आपल्या दारीसाठी बसेस पाठवल्याने विद्यार्थी ताटकळले

अमळनेर (प्रतिनिधी) जळगावला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी अमळनेर आगारातूनही जादा बसेस सोडण्यात आल्याने शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. काही तास विद्यार्थी बसस्थानकावर ताटकळत उभे होते. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यासाठी विविध क्षेत्रातील लाभार्थ्यांना जळगाव आणण्यासाठी आदेश सुटले होते. आणि अधिकारी, पदाधिकारी यांना बस भरून आणण्यासाठी सक्ती करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे अमळनेर तालुक्यातून देखील २५ एसटी बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे अमळनेर आगारातील बस फेऱ्यांवर परिणाम झाले. आगारात ७० बस असून २५ जळगाव दौऱ्यासाठी पाठवण्यात आल्या होत्या. त्यात काही नादुरुस्त असल्याने आणखीच अडचण वाढली होती.

पालकांची वाढली चिंता

ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी शाळेत ,महाविद्यालयात अमळनेरला येत असतात. परंतु सकाळी काही ठिकाणी एसटी पोहचलीच नाही. आणि काही ठिकाणी उशिरा एसटी पोहोचल्याने मुले मुली शाळेत जाऊ शकले नाहीत. काहींना उशिरा बस मिळाली. सर्वत्र हीच अडचण आल्याने मुलांमध्ये एसटीचा संप असल्याची अफवा पसरली होती. दुपारून मुले मुली घरी पोहचली नाहीत म्हणून पालकांना चिंता वाटत होती. काही पालक आपल्या आपल्या पाल्याना शोधण्यासाठी अमळनेर आले होते.

उशीर झाला, पण बसेस सोडल्या

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी २५ जादा बसेस सोडल्या आहेत. काही बसेस नादुरुस्त होत्या, त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. काही विद्यार्थ्यांना उशीर झाला. मात्र सर्व ग्रामीण भागात बस सोडल्या होत्या.
इम्रानखान पठाण , आगार व्यवस्थापक , अमळनेर

जबरदस्ती ,धमक्या देत बसेस पाठवून विद्यार्थी आणि शेतकरी यांचे केले हाल

जळगाव येथे झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या नावाखाली मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्यासाठी जबरदस्ती ,धमक्या देत बसेस पाठवून विद्यार्थी आणि शेतकरी यांचे मात्र हाल करण्यात आले ही निषेधार्ह बाब आहे.
अनिल भाईदास पाटील , आमदार ,अमळनेर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button