खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

लायन्स क्लब अमळनेरचा आज ५५ वा पदग्रहण सोहळा रंगणार

अमळनेर (प्रतिनिधी)  येथील लायन्स क्लब अमळनेर २०२३-२४ चा ५५ वा पदग्रहण सोहळा २४ जून रोजी सायंकाळी ७ वाजता बन्सीलाल पॅलेस येथे पार पडणार आहे.
या सोहळ्याला अबू रोड राजस्थान येथील ला.अविनाश शर्मा, पीएमजेएफ जळगाव येथील गिरीश सिसोदिया, एमजेएफ नंदुरबार येथील हिना रघुवंशी यांच्या प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या वेळी लायन्सच्या नवनियुक्त प्रेसिडेंटपदी दिलीप गांधी, सेक्रेटरी दिनेश मणियार, खजिनदार पंकज मुंदडे, तर लिओच्या प्रेसिडेंटपदी प्रणित झाबक, सेक्रेटरी वेद पाटील, खजिनदार चिराग मुंदडे हे पदभार स्वीकारणार आहेत. सन  २०२२-२३ चे मावळते प्रेसिडेंट योगेश मुंदडे, सेक्रेटरी महावीर पहाडे, खजिनदार अनिल रायसोनी, लिओचे प्रेसिडेंट हरिओम अग्रवाल, सेक्रेटरी मिहीर पवार, खजिनदार कौशल गोलच्छा यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button