खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

मारवड येथे कल्याण मटका सट्टा घेणाऱ्यास केली अटक

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मारवड येथे पोलिसांनी छापा टाकून सट्टा घेणाऱ्या एकावर कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. यामुळे जुगारींमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील मारवड येथे सेंट्रल बँकेच्या मागे सार्वजनिक जागी सट्टा लावला जात असल्याची माहिती मिळाल्याने मारवड पोलिसांनी छापा टाकला असता संतोष सोनू सूर्यवंशी हा कल्याण मटका नावाचा सट्टा घेताना रंगेहाथ आढळून आला. त्याच्याकडून ४५० रुपये रोख आणि सट्ट्याचे साहित्य आढळून आले असून पो. कॉ. तुषार वाघ यांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोना सुनील तेली हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button