खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

संभाजी ब्रिगेडतर्फे मुंबईस्थित अमळनेरचे नामवंत पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांचा गौरव

अमळनेर (प्रतिनिधी) संभाजी ब्रिगेडतर्फे मुंबईस्थित अमळनेरचे नामवंत पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांचा संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी किल्ले पुरंदर येथे सन्मान केला.
संभाजी ब्रिगेडकडून स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त किल्ले पुरंदर येथे विविध मान्यवरांना छत्रपती संभाजी महाराज पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यात अमळनेर विधानसभा मतदार संघातील रत्नापिंप्री येथील मूळ रहिवासी मात्र मुंबई त इंडियन एक्स्प्रेसचे पत्रकार सुधीर सुर्यवंशी,यांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज पुरस्काराने गौरव करण्यात आला. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर लिहिलेल्या ‘चेकमेट’ या गाजलेल्या पुस्तकाचे सूर्यवंशी हे लेखक आहेत,सूर्यवंशी यांच्या सोबत प्रसिद्ध अभिनेता हास्यजत्रा फेम गौरव मोरे, लेखक केतन पुरी यांचा देखील सन्मान यावेळी करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button