खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

सातासमुद्रापार दुबईत महाराष्ट्राचा जयघोष, कामगार दिनाचाही झाला कार्यक्रम

अमळनेर (प्रतिनिधी) १ मे महाराष्ट्र दिवस व कामगार दिन हा महाराष्ट्रासह साता समुद्रापार संस्कृती मराठी मंडळ दुबई यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिन अगदी साजरा केला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सोशल मेडीयावरील पाहुणे कलाकार ज्योतीताई सावंत, इंटरनॅशनल सद्गुरू फाऊंडेशनचे पदाधिकारी श्री महेशजी कुमठेकर, दुबईतील आखाती बांधवाना एकत्रित करणारे युवा उद्योजक सुशांतसर चिल्लाळ आणि सौ माधुरीताई बोंद्रे-रहाळकर यांनी हजेरी लावली प्रमुख पाहुणे व संस्क्रृती मंडळाचे पदाधिकारी त्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुण कार्यक्रमाला सुरवात झाली मंडळ २०२१ ला चालु झाल्यापासून आत्तापर्यंत केलेल्या कार्यक्रमांचे बायो फोटोग्राफीचं पुस्तकाचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
मंडळातर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यात छान असे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. त्यात अनु कच्छाव, ईला, विकास, स्नेहल जाधव व सहकारी व त्याच दुबईमधील महिलांचे साई लेझिम पथक यांनी आपापली कला सादर केली. कार्यक्रमात सुशांत चिल्लाळ यांनी सर्वांना महाराष्ट्रावर आधारित प्रश्नमंजुषा घेतली. यात प्रश्नाची योग्य उत्तर देन्यार्याला छान छान बक्षिसाचं वितरण करण्यात आले.
त्याच बरोबर ज्योतीताई सावंत यांनी आपला जीवनप्रवास सांगात प्रेक्षकांना खुप हसवलं. त्याच प्रमाणे महेश कुमठेकर यांनी इंटरनॅशनल सदगुरु फाउंडेशनचे कार्य व माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना यादव, श्री मनोज बागल, मंदार कुलकर्णी यांनी केले तसेच आभार रेखा सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर मुंढे आणि मंडळातील सर्व पदाधिकारी व सभासदांचा खुप मोठा हातभार लावला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button