खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

नगरपरिषद निवडणुकीत भाजपाला सत्तेपासून कुणीही रोखू शकणार नाही

अमळनेर भाजपच्या बैठकीत माजी आमदार स्मिताताई वाघ यांनी व्यक्त केला विश्वास

पाडळसरे धरण आंदोलनावेळी गायब स्मिताताई यांना निवडणूक आल्याने आली आता जाग !

अमळनेर (प्रतिनिधी) आगामी नगरपरिषद निवडणुकीत क्रियाशील झाल्यास भाजपाला सत्ता काबीज करण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही, संघटना काय असते हे भाजपाने वेळोवेळी सिद्ध केलेच आहे, असा विश्वास भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार स्मिताताई वाघ यांनी अमळनेर शहर भाजपच्या बैठकीत व्यक्त केली.
अमळनेर शहरातील भारतीय जनता पार्टीचे शक्तिकेंद्र प्रमुख, विस्तारक व बूथ प्रमुख यांची बैठक नुकतीच वाडी चौकातील संत सखाराम महाराज कार्यालयात पार पडली. आगामी काळात येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकी संदर्भात संघटनात्मक चर्चा करण्यासाठी ही बैठक असल्याने शहरातील सारेच शक्ती केंद्र प्रमुख, विस्तारक, बूथ प्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते यामुळे सभागृह हाऊस फुल्ल झाले होते.सुरवातीला प्रास्तविक शहराध्यक्ष उमेश वाल्हे यांनी करत संघटनात्मक बाबींचा आढावा मांडला यानंतर भाजपाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख शितल देशमुख, तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील व खा शि मंडळाचे माजी चेअरमन प्रभाकर कोठावदे यांनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीस दिलीप ठाकूर, खा शि मंडळ उपाध्यक्ष माधुरी पाटील, स्नेहा एकतारे, नगरसेविका नुतन महेश पाटील, महेश पाटील, प्रफुल्ल पवार जिजाबराव पाटील, श्रीनिवास मोरे, शहर सरचिटणीस राकेश पाटील, जेष्ठ कार्यकर्ते सोमा ठाकूर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष योगीराज चव्हाण, युवामोर्चा शहराध्यक्ष पंकज भोई,तुळशिराम हटकर, गिलीगिली पप्पू, देवा लांडगे, बापु हिन्दुजा, दिलीप साळी, अशपाक शेख,मुन्ना कोळी, शेखर मराठे,नितीन गुरव, समाधान पाटील, सागर ठाकूर, सौरभ पाटील, निनाद जोशी, दिपक चव्हाण, राम कलोसे, अनिल लाड, विजय वानखेडे, रिक्षा युनियन अध्यक्ष किशोर पाटील, गोकुळ पाटील, अनिस खाटीक, गौरव महाजन, विलास शिंगाने यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन शहर उपाध्यक्ष चंद्रकांत कंखरे यांनी केले. आभार शहर सरचिटणीस विजय राजपूत यांनी मानले.

पाडळसरे धरण आंदोलनावेळी ताई होत्या कुठे? उपस्थित होऊ लागला प्रश्न

नगरपालिक, बाजार समितीसह अन्य निवडणुका जवळ आल्याने माजी आमदार स्मिताताई यांना आता जाग आली. बैठकीत विजयाचा विश्वास व्यक्त करीत आहेत. पण एवढ्या दिवस त्या कुठे गायब होत्या. पाडळसरे धरण आंदोलना वेळी त्यांनी चक्क दांडी मारली होती. हे धरण अमळनेर शहराशी निगडित नाही का, मग आता मते मागण्याची वेळ येणार असल्याने त्यांना कशी जाग आली. नागरिक याचा त्यांना जाब विचारल्या शिवाय राहणार नाहीत. निवडणूक आली तेव्हाच जागे व्हायचे आणि इतर वेळी मूग गिळून बसायचे ही कोणती पध्दत आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button