खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

प्रतापचे महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर, बारावीच्या परीक्षावर परीणाम

कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयाच्या बाहेर ठिय्या मांडून केली जोरदार निदर्शने

अमळनेर (प्रतिनिधी) राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी कृती समितीच्या आदेशाने. दि 20 फेब्रुवारी पासून एकत्रित संपावर गेले असल्याने अमळनेर प्रताप महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी देखील बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. यामुळे  21 फेब्रुवारीपासून 12 वी बोर्डाची परीक्षा सुरू होत असल्याने या परीक्षा कामकाजावर देखील संघटनेने बहिष्कार टाकल्याने महाविद्यालयीन प्रशासन मोठ्या अडचणीत आले आहे. प्राचार्य आणि प्राध्यापकांना इतर कामे करावी लागली.
सर्व कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयाच्या बाहेर ठिय्या मांडून जोरदार निदर्शने केली.यावेळी संघटनेचे विभागीय व महासंघ पदाधिकारी विजय सजन पाटील, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय ठाकरे यांनी मनोगत व्यक्त करून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला. खा. शि. मंडळाचे कार्योपाध्यक्ष योगेश मुंदडा, संचालक डॉ. अनिल शिंदे,प्रदीप अग्रवाल, नीरज अग्रवाल,चिटणीस प्रा ए बी जैन, प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक संघटना आदींनी उपस्थिती देऊन आंदोलनास बळकटी दिली. या आंदोलनामुळे महाविद्यालयात परीक्षा कामकाजाच्या तयारीला अडथळा निर्माण झाला होता.
दरम्यान  राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी आपल्या प्रमुख पाच मागण्यासाठी 20 फेब्रुवारीपासून सर्व बोर्ड व विद्यापीठाच्या परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार आंदोलन करणार असल्याची घोषणा विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात आली होती, त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले. यावेळी नरेंद्र सातपुते, राकेश निळे,भटु चौधरी,सचिन खंडारे,अजय साटोटे, संजय पाटील,उमेश ठाकूर, दिलीप सोनवणे,संदीप बिऱ्हाडे, प्रवीण धनगर, देवेंद्र कांबळे, कैलास सैनदाने, संदीप सोनवणे, गुणवंत वाघ,योगेश बोरसे, दुर्योधन नेरकर,महेंद्र काटकर आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिक्षकेतर कर्मचारी हा महाविद्यालयाचा कणा, व आत्मा

कालच्या आंदोलनात विजय पाटील यांनी मार्गदर्शन करताना मत व्यक्त केले की विद्यार्थी, पालक, स्थानिक प्रशासन,यांना वेठीस धरून बेमुदत संप पुकारण्या उद्देश नसून. “मंत्रालयीन प्रशासनाच्या चुकीच्या कार्यपद्धतीचा फटका तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या व सेवा निवृत्त होत असलेल्या/ होणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसत आहे.हे समाजानेही समजून घेऊन. सहानुभूती दर्शविली पाहिजे ही अपेक्षा व्यत केली.  शिक्षकेतर कर्मचारी हा महाविद्यालयाचा कणा, व आत्मा असून त्याच्या न्याय्य व गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित  मागण्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे,तसेच आमचा संप हा कोणत्याही संस्थाचालक किंवा प्राचार्यांच्या विरोधात नसून जो पर्यंत आमच्या मागण्या शासन निर्णय काढून मान्य होत नाही. तो पर्यंत  कोणत्याही परिस्थितीत संप मागे घेतला जाणार नाही ” असे ते म्हणाले.

या मागण्यांसाठी पुकारले आंदोलन

सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जिवित करुन पूर्ववत लागू करा. केंद्रीय वेतन आयोग मा.बक्षी समितीच्या शिफारशी नुसार सेवेतील 10.20.30 वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करा. सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या 1410 विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करुन विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 ते प्रत्यक्ष सातवा वेतन लागू झाला. त्या कालवधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करा. विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता द्या. सन 2005 नंतर सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा. विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून वेतनश्रेणी गृहित धरून त्या आधारे सातवा वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button