खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अल्पसंख्यांक विकास योजनेनंतर्गत अमळनेर तालुक्यासाठी २५ लाखांचा निधी-आ शिरीष चौधरी

अमळनेर (प्रतिनिधी )अल्पसंख्यांक विकास योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी ७५ लाखांचा निधी मंजूर झाला असून यात २५ लाख रु निधी अमळनेर तालुक्यास मिळाला असल्याची माहिती आ शिरीष चौधरी यांनी दिली.
सदर 25 लाख निधीतुन अमळगाव येथे अल्पसंख्याक समाज शादीखाना बांधकाम करणे १० लाख, मारवड येथे कब्रस्थानास वॉल कंपाउंड करणे १० लाख, तसेच शिरसाळे येथे अल्पसंख्याक समाजासाठी सामाजिक सभागृह बांधकाम करणे ५ लाख आदी विकासकामे मार्गी लागणार आहेत.सदर मंजुरीबाबत अल्प -संख्यांक विकास विभागाने दि ४ ऑक्टोबर रोजी शासन निर्णय काढला आहे. दरम्यान आ शिरीष चौधरी यांनी सुरवातीपासून सर्वसमावेशक धोरण ठेवत समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे,यामुळे सर्व समाजात त्यांच्याबाबत समाधान आहे,अल्पसंख्यांक विकास योजनेंतर्गत अनेक गावांना विकास कामांची शिफारस त्यांनी केली होती, त्यापैकी तीन गावांना निधी मिळाला असून पुढील टप्प्यात उर्वरित गावांना निधी मंजूर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button