खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्याब्रेकिंग

मानव सेवेचा त्यांचा चढता आलेख कामातून दाखवताय अखलाक शेख

अमळनेर (वर्धापन दिन विशेष) मुस्लिम समाजात मानव सेवेसाठी अखलाक शेख यांचे भरीव कार्य आहे. आपल्या कामातून त्यांनी आपले समाजात मोठे वयल निर्माण केले आहे. शांत आणि मृदृ स्वभावामुळे त्यांच्या संगतीत येणाऱ्या प्रत्येकाला ते आपलासा करून घेतात. त्यांचा मानव सेवेचा हा आलेख वाढतच जात आहे.
अखलाक अहमद कमरूज्जमा शेख अखलाक शेख यांचे झामी चौकात रॉयल मेडिकल आहे. यातूनच ते परिवाराचा उदरनिर्वाह करता मानव सेवा करीत आहे. त्यांना तीन मुले आहेत ते शिक्षण घेत आहेत. लहानपनापासूनच त्यांना मानस सेवा करायला आवडते. त्या माध्यमातून जो आनंद मिळतो तो मनाला शांती देतो, असे ते सांगतात. कोरोनाचा काळ फार वाईट होता. ईश्वराला प्रार्थना करतो की हा काळ पुन्हा येऊ नये आणि ज्या लोकांनी या काळात मानस सेवा केली त्या लोकांनी खूप पुण्याचे काम केले. सर्व समाज बांधवांनी, डॉक्टरांनी, पोलिसांनी, सरकारी कामगारांनी, पत्रकार बंधूंनी व समाजसेवकांनी विना जात-पात सेवा केली, हेच काम आपल्या भारताला महान बनवत आहे, अशी सेवा माझ्या हातूनही व्हावी यासाठी मी नेहमी प्रयत्न करत असतो, असे ते सांगतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button