खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

बसस्थानकासमोरील भागवत रस्ता मोकळा करा, अन्यथा आंदोलनाला सामोरे जावे

शिवसेना (उठा) पदाधिकाऱ्यांनी नगर पालिका प्रशासनाला दिला इशारा

अमळनेर (प्रतिनिधी) नगरपालिकेने बसस्थानकासमोरील भागवत रस्त्यावर लोखंडी पाईप गाडून अडथळे निर्माण केला आहे. यामुळे मात्र सोय एवजी गैरसोय झाल्याने हा रस्ता त्वरित मोकळा करण्यात यावा अन्यथा शिवसेना (उठा) 26 जानेवारी रोजी आपल्या स्टाईलने आंदोलन करेल असा इशारा सेना पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेला निवेदनाद्वारे दिला आहे.
मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील बसस्थानकासमोरील भागवत रस्ता हा सार्वजनिक वहिवाटीचा असून नगरपरिषदेने या रस्त्यावर लोखंडी खांब गाडून वाहनांना अडथळे निर्माण करून कायदेशीर गुन्हा केला आहे. या रस्त्यावरून प्रताप महाविद्यालय , डी आर कन्या शाळा , पी बी ए इंग्लिश मिडीयम स्कूल च्या विद्यार्थिनी , ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला वृद्ध ये जा करीत असतात. मात्र अडथळ्यांमुळे हातगाड्या तसेच अवैध प्रवासी वाहने उभी राहत असल्याने मुलींना व महिलांना त्रास होतो. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर अडथळे टाकणाऱ्या तसेच तसा ठराव करणाऱ्या नगरपालिका अधिकारी ,पदाधिकारी यांच्यावर भादवि कलम २८३ ,३४१ मुंबई पोलीस अधिनियम १०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच रस्त्यातील अडथळे ठरणारे लोखंडी खांब दूर करण्यात यावेत आणि वाहतूक सुरळीत करण्यात यावी अन्यथा २६ जानेवारी रोजी शिवसेना आपल्या स्टाईल ने आंदोलन करेल आणि कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्यास जबाबदार प्रशासन असेल असा इशारा सेना पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे याना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी तालुका प्रमुख श्रीकांत पाटील ,उपजिल्हाप्रमुख कल्याण पाटील , शहर प्रमुख सुरज परदेशी , विधानसभाक्षेत्र प्रमुख बाळासाहेब पाटील , चंद्रशेखर भावसार , मोहन भोई , देवेंद्र देशमुख , प्रताप शिंपी ,विलास पवार , रोहित पाटील ,ज्ञानेश्वर पाटील , विश्वास दशरथ सोनवणे हजर होते. निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी , उपविभागीय अधिकारी , डीवायएसपी , पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आल्या आहेत.

Live

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button