खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
क्राईम

तलवार आणि चाकू घेऊन दहशत माजवणारा दादू धोबीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अमळनेर (प्रतिनिधी) पोलीस, अधिकारी आणि व्यापाऱ्यांवर हल्ले करणारा सराईत गुन्हेगार दादू धोबी शहरातील वर्दळीच्या सुभाष चौक भागात तलवार व चाकू घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत होता. त्याला पोलीस निरीक्षक विजय शिंदे व त्यांच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यापूर्वी पालिकेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड , पोलीस कर्मचारी तसेच एका व्यापाऱ्यावर हत्याराने हल्ला करणारा सराईत गुन्हेगार राजेश एकनाथ निकुंभ उर्फ दादू धोबी (रा. जुना पारधीवाडा) हा सुभाष चौकात तलवार व चाकू घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी डीवायएसपी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाने हेडकॉन्स्टेबल कपिल पाटील, पोलीस नाईक मिलिंद शिंदे , लक्ष्मीकांत शिंपी , सूर्यकांत साळुंखे यांच्या पथकाला पाठवले. आरोपी दादू हा पटेल फोटो स्टुडिओच्या बोळीत आढळून आला. पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून त्याला अटक केली. त्याच्यावर शस्र कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण कुमावत करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button