खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

कनिष्ठ अभियंता वैभव देशमुख यांच्या सांगण्यावरुन मी मागत होतो १० हजार!

लाचखोर वीज कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञ भरत कैलास पाटील याने दिली माहिती

न्यायालयात उभे केले असता दोन दिवसाची सुनावली होती कोठडी आज पुन्हा हजर करणार…

अमळनेर (प्रतिनिधी ) आमचे कनिष्ठ अभियंता वैभव देशमुख यांच्या सांगण्यावरुन मी १० हजार मागत होतो. तडजोडी अंती ५ हजार रुपये लाच घेतांना मी पकडला गेलो,अशी माहिती लाचखोर वीज वितरण कंपनीच्या अमळनेर शहर विभागाच्या वरिष्ठ तंत्रज्ञ भरत कैलास पाटील याने दिली. तर त्याला न्यायालयात उभे केले असता दोन दिवसाची कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील क्रांती नगरातील रहिवासो ( उबाठा ) चे तालुका प्रमुख श्रीकांत अनिल पाटील यांच्या निवासस्थानाचे फॉल्टी वीज मीटर बदलून देणे व दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी ५ हजाराची लाच स्विकारतांना धुळ्याच्या अँटी करेप्शन ब्युरोच्या पथकाने वीज वितरण कंपनीच्या अमळनेर शहर विभागाच्या वरिष्ठ तंत्रज्ञ भरत कैलास पाटील ( ३२ ) यांस दि .५ च्या सायंकाळी ७-३० वाजता रंगेहात पकडले होते. अमळनेरचे जिल्हा सत्र न्यायाधिश एस. बी. गायधनी यांनी त्या आरोपीस २ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. जळगाव एसीबीच्या पोनि जाधव यांनी अटकेतील आरोपी भरत पाटील यास मंगळवारी अमळनेर सेशन कोर्टात हजर केले होते. पोलीसांतर्फे सरकारी वकील अॅड. आर. बी. चौधरी यांनी बाजू मांडली. कोर्टाने त्या आरोपीस दिनांक ८ डिसेंबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर आरोपी असा सांगून गेला आहे की , आमचे कनिष्ठ अभियंता वैभव देशमुख यांच्या सांगण्यावरुन मी १० हजार मागत होतो . तडजोडी अंती ५ हजार रुपये लाच घेतांना मी पकडला गेलोय . त्याबाबत चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे . श्रीकांत पाटील यांच्या निवासस्थानाचे वीज मोजणी मीटर नादुरुस्त होते. सरासरी बिल येत होते. ते बिल महिन्याच्या महिने श्रीकांत पाटील अदा करत आले आहेत . १० दिवसापूर्वी वैभव देशमुख यांनी या मीटरची घरी येवून पाहणी केली होती , असे सांगण्यात येत आहे . श्रीकांत पाटील यांच्या एसीबीचे तक्रारीवरुन धुळे डीवायएसपी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. मनजितसिंग चव्हाण व सहकारी पो. नि . प्रकाश झोडगे यांच्या पथकाने हा ट्रॅप यशस्वी करून दाखविला आहे .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button