खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयाने मिळवले यश

अमळनेर (प्रतिनिधी) तालुका स्तरावरील आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यांचे कौतुक केले जात आहे.
या मैदानी स्पर्धा अमळनेर येथील क्रीडा संकुलात यशस्वीरीत्या पार पडली. निवड झालेले विद्यार्थी जिल्ह्या स्तरावर खेळण्यासाठी जाणार आहेत.
याप्रसंगी तालुका क्रीडा शिक्षक प्रमुख एस पी वाघ सर होते तसेच क्रिडा शिक्षक एस. आर जाधव सर, स्वप्निल पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व परिश्रम घेतले. धनदाईमाता एज्यु.संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब डी. डी पाटील , संस्था उपाध्यक्ष तथा जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब के.डी. पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.तसेच क्रीडा शिक्षक एस आर जाधव, स्वप्निल पाटील यांचे विशेष सत्कार केला.शांतीनिकेतन प्राथ.शाळेच्या मुख्याध्यापिका निवेदिता कापडणेकर, संजय सोनवणे , सुर्यवंशी, के.बी पाटील यांचाही सत्कार यावेळी सत्कार करण्यात आला.शांतीनिकेतन प्राथमिक व जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.

हे आहेत स्पर्धेतील यशस्वी खेळाडू

या मैदानी खेळात ४०० मिटिर धावणे या स्पर्धेत तन्वी राजेंद्र पवार ( इ८वी) हिने प्रथम क्रमांक पटकावला .६०० मिटर धावणे स्पर्धेत अंकिता संदीप पाटील( इ. ७ वी) द्वितीय क्रमांक तर जया विकास कोळी (इ.६वी) हिने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच ३हजार मिटर धावणे या स्पर्धेत भुषण उत्तम चौधरी (इ.१० वी) या विद्यार्थ्यांने तृतीय क्रमांक मिळविला. या चुरशीच्या लढतीत विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button