खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

कृषी उत्पन्न बाजार समितीचे शासकीय प्रशासक म्हणून व्ही. एम. जगताप नियुक्त

अमळनेर (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शासकीय प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई यांनी सहकार अधिकारी व्ही. एम. जगताप यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी २१ रोजी दुपारी दोन वाजता बाजार समितीचा पदभार घेतला.
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत १४ सप्टेंबर २०२२ मध्ये संपली होती. त्यानंतर कोरोनामुळे निवडणुका घेता आल्या नव्हत्या. म्हणून बाजार समितीवर सहा महिने शासकीय प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक गुलाबराव पाटील यांची नियुक्ती झाली होती. शासकीय प्रशासकाची सहा महिने मुदत पूर्ण झाल्यावर अशासकीय प्रशासक नेमण्यात आले होते. तिलोत्तमा पाटील मुख्य प्रशासक म्हणणून काम पाहत होते.जानेवारी २०२२ मध्ये त्यांची मुदातसंपल्यांनातर ३ महिने पुन्हा अशासकीय प्रशासकाची मुदत वाढवण्यात आली होती. एप्रिल मध्ये त्यांची मुदत संपली. मात्र त्यांनतर कोणतीही मुदतवाढ न मिळाल्याने आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने पणन महामंडळाच्या १६ नोव्हेंबरच्या पत्रानुसार सहकार अधिकारी व्ही एम जगताप यांची अशासकीय प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button