खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचा दोन दिवशीय वार्षिक क्रीडा महोत्सव रंगला

“अग्नी” हाऊसने ‘प्रथम क्रमांक’ पटकावत क्रीडा महोत्सवावर केला विजेतेपदाचा शिक्कामोर्तब

अमळनेर (प्रतिनिधी) देशीसह विदेशी खेळांत विद्यार्थ्यांनी मैदान गाजवत दाखवलेल्या चुरसीच्या लढतीने स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचा दोन दिवशीय वार्षिक क्रीडा महोत्सव चांगलाच रंगला. या महोत्सवात “अग्नी” हाऊसने ‘प्रथम क्रमांक’ पटकावत क्रीडा महोत्सवावर विजेतेपदाचा शिक्कामोर्तब केला.
मान्यवरांच्या हस्ते हवेत फुगे सोडून, विद्यार्थ्यांचा मार्च पास (पथसंचलन), मानवंदना  व मशाल पेटवून अतिथींचे स्वागत आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेलेल्या उत्कृष्ट नृत्याने क्रीडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन करण्यात आले. दिनांक १९  व  २० नोव्हेंबर असा दोन दिवस हा क्रीडा महोत्सव शाळेच्या क्रीडा पटांगणामध्ये चांगलाच रंगला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मार्गदर्शक डी. डी. पाटील, ‘खबरीलाल’ चे संपादक जितेंद्र ठाकूर, सकाळ चे उमेश काटे, शिरपूर चे स्पोर्ट्स टीचर जयवंत ठाकूर, विनोद अमृतकर,लोकमत चे  संजय पाटील, सुनील वाघ, जास्मिन बरुचा, शालेय व्यवस्थापन समिती सदस्या आचल अग्रवाल, सितीका अग्रवाल, ममता अग्रवाल, शाळेचे चेअरमन नीरज अग्रवाल, मुख्याध्यापक हेमंतकुमार देवरे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापकांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन केले. क्रीडाशिक्षक सुनील करंदीकर, ममता पाटील, हर्षदा सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन व सहकार्य साभले. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सामने बघण्यासाठी मैदानात गर्दी केली होती. विजयी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सुवर्ण, कास्य व रोप्य असे तीन प्रकारचे पदक प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन निशा पाटील, राजश्री देसले,  नयना पाटील व महेश जेठवा यांनी केले. मुख्याध्यापक हेमंत कुमार देवरे यांनी आभार मानले.

विद्यार्थ्यांचे हाऊसेसनुसार वर्गीकरण

वार्षिक क्रीडा महोत्सवात पूर्व प्राथमिक , प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या सर्व र्विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांचे हाऊसेस नुसार म्हणजेच अग्नी, आकाश, पृथ्वी व त्रिशूल अशा चार प्रकारात वर्गीकरण करण्यात आले होते. पहिल्या दिवशी सामन्यात पूर्व प्राथमिक, इयत्ता पहिली व  दुसरीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. तर दुसऱ्या दिवशी क्रीडा सामन्यात इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. तेव्हा कार्यक्रमांमध्ये विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

पहिल्या दिवशी रंगल्या या स्पर्धा

पहिल्या दिवशी क्रीडा सामन्यात हर्डल रेस, झिगझ्याग रेस, सॅक रेस, इटिंग बिस्कीट, नबरिंग गेम्स, कलेक्टिंग ऑब्जेक्ट्स, सोलविंग पझल, कॉलेक्टिंग वॉटर विथ स्पोंज, कॅच द बॉल, टग ऑफ वॉर आदी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दुसऱ्या दिवशी अशा रंगल्या स्पर्धा

दुसऱ्या दिवशी  क्रीडा सामन्यात १००. २००, ४०० मिटर धावणे, सॅक रेस, भाला फेक, स्लो सायकलिंग, ५०×४ v १००×४ मिटर रीले रेस अशा अनेक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा सर्व खेळाडू आपले कौशल्य पणाला लावून खेळ खेळत होते अनेक चुरशीचे सामने झाले,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button