खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अंतुर्ली येथे कार्तिक स्वामी मंदिर संस्थांनतर्फे सोमवारी कार्तिक स्वामींचा भव्य यात्रोत्सव

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंतुर्ली येथे कार्तिक स्वामी मंदिर संस्थांनतर्फे ७ रोजी कार्तिक स्वामींचा भव्य यात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
कार्तिकी पौर्णिमेनिमित्त मंगळवारी ८ रोजी मध्यरात्री १.३९ वाजेपासून तर ९ रोजी मध्यरात्री ३.०९ पर्यंत कृत्तिका नक्षत्र असून या मुहूर्तावर कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येईल. वर्षभरात फक्त याच कालावधीत महिलांना कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येते. पृथ्वीचे भ्रमण करताना कार्तिक स्वामी अंतुर्ली याठिकाणी उतरल्याची आख्यायिका आहे. महाराष्ट्रातील तीन मंदिरांपैकी अंतुरलीचे एक मंदिर आहे. भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्तानी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button