खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेरात ५ ऑक्टोबर रोजी कॉग्रेसची जन-संघर्ष यात्रा..

तीन माजी मुख्यमंत्र्यासह ३०/३५ आमदारांची उपस्थिती!अमळनेर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष मा.खासदार व माजी मुख्यमंत्री श्री.अशोकराव चव्हाण यांचे नेतृत्वाखाली ५ ऑक्टोबर २०१८ शुक्रवारी दुपारी १२=३० वा. अमळनेर शहरात पैलाड चोपडा नाका येथे जन-संघर्ष-यात्रेचे आगमन होणार आहे.
देशातील वाढती-महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढते भाव शेतकाऱ्यांवरील अन्याय अत्याचार,रॉफेल विमान घोटाळा, बँकाची लुट करून देशाचे तिजोरीवर होणारा हल्ला,भ्रष्टाचार आणि संविधानात बदलासह दलीत-मुलींवर देशभर होणाऱ्या अत्याचारांविरूध्द महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तर्फे राज्यभर जन-संघर्ष-मोर्चाद्वारे तीव्र आंदोलन व जनजागृती केली जात आहे.
या कामी आयोजीत अमळनेर तालुका-शहर काँग्रेस कमिटीची अंबिका मंगल कार्यालयात बैठकीत तालुकाध्यक्ष गोकुळ आबा बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटीलप्रा.सुभाष जिभाऊ पाटील यांनी मार्गदर्शन केले बैठकीस सुमारे ४००/५०० कार्यकर्त्यांची भरगच्च उपस्थिती होती. जन-संघर्ष यात्रा ५ ऑक्टोबर शुक्रवार रोजी दुपारी-१२=३० वा.पैलाड चोपडा नाक्यावरून निघेल दगडी दरवाजा मार्गे पाच कंदिल, डॉ.आंबेडकर पुतळा, सुभाषबाबु पुतळा, पु.सानेगुरूजी पुतळा पुष्पहार अर्पण करून त्या मार्गे श्रीमंत प्रताप शेठ पुतळयाजवळ समारोप होईल.
जन संघर्ष यात्रेत पाडळसरे धरण,प्राध्यापकांच्या मुक्टो संघटनेचे आंदोलन,तालुका दुष्काळी जाहीर करणे,खरीप पीक विमा२०१७ -१८ आदि प्रकरणी निवेदने दिली जाणार असुन,संघर्ष यात्रेत माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,विरोधी पक्षनेते राधा कृष्ण विखे-पाटील आणि काँग्रेस पक्षाचे ४०/५० आमदार उपस्थित राहणार आहेत.
तरी अमळनेर तालुक्यातील तमाम काँग्रेस-पक्षाचे कार्यकर्ते-नेते पदाधिकारी,समर्थक व काँग्रेस प्रेमी जनतेसह शेतकरी-शेतमजुरां सह सर्वांनी उपस्थिती द्यावी.असे आव्हान तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष गोकुळ आबा बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील, धनगर अण्णा पाटील,प्रा.सुभाष जिभाऊ पाटील माजी तालुकाध्यक्ष शांताराम बापु पाटील,महीला जिल्हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ.सुलोचना वाघ यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button